डोळे येणे हा एक प्रकारचा संसंर्ग आहे.त्यामुळे घरात एकाला डोळे आले कि ते संसर्गामुळे घरातील इतरांना होते. त्यामुळे सगळ्यांनी नीट काळजी हि घेतली पाहिजे.डोळे येणे म्हणजे त्यात आपल्या डोळ्यांचा जो पांढरा भाग आहे तो खूप लाल होतो.तसेच डोळ्यातून खूप घाण आणि पाणी सतत येत राहते.
डोळे हे बॅक्टरीयामुळे आणि दूषित वातावरणामुळे येतात. डोळे आल्यास सतत खूप त्रास होत असतो. डोळे हे सुजतात आणि डोळे आल्यास डोळे खूप लाल होतात . तसेच डोळ्यातून खूप घाण व पाणी सतत येत राहते.
डोळे येण्याची लक्षणे:-
डोळे हे आपल्याला इन्फेकशनमुळे येतात किंवा ऍलर्जी मुळे येतात. तसेच डोळे येणे हे विषाणूमुळे आजार होतो. शाळा ,कॉलेज आणि गर्दीच्या टिकणामुळे हा आजार पसरतो. तसेच सर्दी आणि घश्यातील खवखव या विष्णुमुळे देखील होते.
तसेच स्विमिंग पूल मधील क्लोरीन ,धूम्रपान ,परागकण,प्रदूषण या कारणामुळे देखील डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. डोळे आल्यावर डोळे लाल होतात आणि डोळ्यातून सतत पाणी येते. तसेच डोळ्यांना खूप खाज येते आणि काहीवेळा डोळे हे खूप सुजतात.
डोळे आल्यावर घरगुती उपाय करून कशी काळजी घेतली पाहिजे :-
१)डोळे आल्यावर डोळ्याची जळजळ हि जास्त प्रमाणात होते त्यामुळे डोळे थंड पाण्यानी स्वच्छ धुवावेत आणि डॉक्टरांनी दिलेला ड्रॉप डोळ्यात घालावा.
२)डोळे आल्यावर डोळ्यातून सारखं पाणी हे येत राहत त्यामुळे डोळे हे चोळू नयेत आणि डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी रुमालाचा वापर करावा ,म्हणजे डोळ्याचे इन्फेकशन हे पसरणार नाही.
३)डोळे आल्यावर डोळ्याला गॉगल वापरावा त्यामुळे उजेडाचा त्रास हा होणार नाही.
४)डोळे आल्यास अश्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी न फिरता घरातच बसावे त्यामुळे डोळ्याचे इन्फेकशन कोणाला होणार नाही.
५)डोळे आल्यास लेन्स चा वापर करू नये.
६)डोळे आलेल्या लोकांचा टॉवेल आणि रुमाल हा कोणी वापरू नये ,त्यांच्या टॉवेल आणि रुमालाचा वापर इतर कोणी केल्यास त्याचे इन्फेकशन लगेच होते.



