शास्त्रशुद्ध पद्धतीने गौरीपूजन करा घरच्या घरी.
धार्मिक

शास्त्रशुद्ध पद्धतीने गौरीपूजन करा घरच्या घरी.

येत्या शनिवारी येणाऱ्या गौरी पूजनाची सुरुवात सर्वांच्या घरी सुरू झाली असेल. दरवर्षी भाद्रपद महिण्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथीस गौरी आपल्या घरी येतात. श्री गणपती बाप्पाचे आगमन झाल्यावर सर्वाना वेध लागतात ते गौरी लक्ष्मीच्या आगमनाचे. विविध भागात विविध ठिकाणी गौरी पूजन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केले जाते.

काही पौराणिक कथा मध्ये असे संगितले आहे. असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व सौभाग्यवती महिलांनी गौरीला प्रसन्न करून रक्षण करण्यासाठी विनंती केली होती. गौरी मातेने भाद्रपद महिण्यात षष्टी तिथीस सर्व असुरांना संपवले होते. आणि त्यावेळेपासून सर्व सौभाग्यवती महीला गौरीचे पूजन करतात. तीन दिवस गौरीचे पूजन केले जाते यामध्ये तीन दिवस हे वेगवेगळे असतात. पहिल्या दिवशी गौरी आगमन, दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि नैवद्य आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन. प्रामुख्याने हे तीन भाग असतात.

गौरी पूजा हे विविध ठिकाणी वेगळ्या पद्धतीने केली जाते. प्रत्येक घरातील परंपरेनुसार कागदावर गौरीची प्रतिमा काढली जाते, किंवा धातूची किंवा मातीची यांच्या पासून प्रतिमा तयार जाते व त्यांची पूजा केली जाते. तसेच आपापल्या परंपरेनुसार विविध अलंकारांनी सजवण्यात येते. व शुभ मुहूर्त पाहून त्यांची पूजा केली जाते.

दुसऱ्या दिवशी जेष्ठ गौरी तिथीला सकाळी आरती करून नैवेद्य दखवला जातो. काही ठिकाणी तर सोळा प्रकारच्या विविध भाज्या केल्या जातात. विविध गोड पदार्थ केले जातात. आणि नैवेद्य दखवला जातो. तर काई ठिकणी केळीच्या पानावर सर्व पदार्थ ठेऊन नैवद्य दाखवाल जातो. तर काई ठकाणी तरनैवेद्य दखवल्यानंतर त्या रूमचा दरवाजा बंद केला जतो करून लक्ष्मी यांचे जेवण करतात म्हणून आणि दुसऱ्या दिवशी ते उघडून पाहिले जाते. तसे काही लोकांच्या घरी तर जो पर्यंत लक्ष्मी आहे. तोपर्यंत पैसा घराबाहेर कोणाला दिला जात नाही किंवा खर्च केला जात नाही.

तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते. सुताच्या गाठी पडतात यामध्ये, यामध्ये विविध प्रकारच्या गोष्टी एकत्र करून त्या पासून गाठी गेल्या जातात. या मध्ये रेशमी सूत, हळदकुंकू , झेंडूची पाने आणि काशीफळ हे सर्व महत्वाच्या गोष्टी असतात. त्यानतंर गौरी पूजा केली जते आरती केली जाते आणि खीर, पापड, आणि भात यांचा नैवेद्य दाखवला जातो. आणि पुढच्या वर्षी येण्याचे निमंत्रण देऊन गौरीचे विसर्जन केले जाते.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.