सगळी दुःखे संपविण्यसाठीचा एक मार्ग गौतम बुद्धांनी सांगिलला आहे. , Gautama Buddha said a way to end all suffering
लाईफस्टाईल

सगळी दुःखे संपविण्यसाठीचा एक मार्ग गौतम बुद्धांनी सांगिलला आहे.

या पृथ्वी तळावर प्रत्येक व्यक्ती कोणत्याना कोणत्या दुःखाने त्रासलेला असतो. प्रत्येक जण हा आपला आपला आनंद शोधत असतो. बऱ्याच लोकांना आनंदी कसे रहायचे याबद्दल माहिती नसते. कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीला काही हि झाले कि माझ्यासोबत असे का होते यावरून चिंता करत असतात आणि दुःखी होतात. आपल्या आजूबाजूला असंख्य गोष्टी घडत असतात त्या गोष्टी वरून जर का आपण नेहमी दुखी रहात असू तर मग आपण आनंदी कधी रहायचे.

असाच एक व्यक्ती गौतम बुद्धाकडे येतो आणि एक प्रश्न विचारतो जो सर्व सामान्य व्यक्तीला नेहमीच पडत असेल तो म्हणजे रोजच्या आयुष्यतील सर्व दुःख विसरून कसे जायचे आणि आनंदाने कसे जीवन जगायचे. मग मला यासाठी काय करवावे लागेल. करणं प्रत्येक व्यक्ती हा आनंदाने रहाण्यासाठीच धपडत असतो. आनंदात रहाण्यासाठी कष्ट करतो आणि दुःखात जगात असतो.

विचारलेल्या प्रश्नावर गौतम बुद्ध विचार करून त्या व्यक्तीला म्हणाले मी तुला काही प्रश्न विचारतो त्याचे तू उत्तर दे. कारण तू जो प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर तुझ्याकडे आहे. फक्त तू त्याकडे जाणीव पूर्वक लक्ष देत नाही. किंबहुना तुला ते समजत नसावे. यावर तो व्यक्ती लगेच म्हणाला मी तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नाचे उत्तर देतो.

गौतम बुद्धांनी संगितलेला दुःख विसरण्याचा योग्य मार्ग

गौतम बुद्धांनी विचारलेले काही प्रश्न तुला मुलगा आहे का? त्यावर तो व्यक्ती लगेचच हो म्हणाला . दुसरा प्रश्न विचारला तुझ्या भावला मुलगा आहे का ? त्यावर तो व्यक्ती म्हणाला हो. त्यानंतर अजून के प्रश्न विचारला तुच्या शेजारी रहाणाऱ्या व्यक्तीला मुलगा आहे का? त्यावर त्या व्यक्तीने उत्तर दिले हो माझ्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मुलगा आहे.

तू ज्या ठिकाणी रहातो त्या गल्लीत असे कोणते घर आहे का त्या घरात मुलगा आहे पण तुला कोणी ओखत नाही. त्यावर तो व्यक्तीने लगेच उत्तर दिले हो. असे अनेक घरे आहे ज्या ठिकाणी मी रहातो आणि त्यांना मुलगा आहे पण ते मला ओळखत नाही. त्यानंतर गौतम बुद्ध म्हणाले मी तुला काही अजून थोडे प्रश्न विचारनार आहे. त्याबद्दल तुला का वाटते त्याबद्दल ते साग.

जर का तूच मुलगा मरण पावला तर तुला काय वाटेल. त्यावर तो वक्ती म्हणतो मलातर खुप मोठा धक्का बसेल मला सर्वात जास्त दुःख होईल. माझ्या आयुष्यात जे काही कष्ट करायचे बाकी आहे;  सर्व त्याला आनंदी रहावे या साठी आहे. असा का विचित्र प्रश्न तुम्ही मला विचारला आहे. त्या नंतर पुन्हा गौतम बुद्ध प्रश्न विचारात. जर का तुच्या भावाच्या मुलाचा मृत्यू झाला तर तुला कसे वाटेल. तो व्यक्ती मानतो दुःख तर होणार पण जीके माझा मुलगा गेल्यावर होणार त्यापेक्षा थोडे कमीच होईल.

दुःख संपविण्याचा योग्य मार्ग

त्याच प्रमाणे जर का तुझ्या शेजारचा व्यक्ती आहे त्याचा मुलगा मरण पावल्यास तुला कसे वाटेल तो व्यक्ती म्हणाला मला दुःख तर होणार पण इतके जास्त प्रमाणत होणार नाही. जर अनोळखी व्यक्तीचा मुलगा मरण पावल्यास दुःख होईल पण काही वेळा साठी. त्याच प्रमाणे गौतम बुद्ध म्हणतात जर का एखादे लहानसे मूल मातीचे घर तयार करत असेल आणि अचानक काही कणांमुळे हे घर कोसळते त्यावेळीस त्या मुलाला काही वेळासाठीच दुःख होते आणि तो पुन्हा नवीन काम तयार करण्यास सज्ज होतो.

त्यावरून गौतम बुद्ध म्हणतात दुःख हे किती काळ आपल्या सोबत ठेवायचे हे आपण ठरवायचे असते. आपण दुःख घेऊन बसतो तर आपल्या जीवनात कोणताच नवीन मार्ग सापडणार नाही. कितीही कष्ट किंवा दुःख आले तरी सुद्धा प्रत्येक वेळेस काही वेळात नंतर नवीन कामास सज्ज रहायचे. यामुळे कामात आपले लक्ष सुद्धा रहाते आणि आपले मन इतर कामात सतत घालत रहायचे.

यावरून एक गोष्ट लक्षात येते कि कोण्या गोष्टीला किती महत्व द्याचे हे आपण ठरवायचे विनाकारण छोट्या छोटया चुकांना आपल्या मनावरती राज्य करू द्याचे नाही. कारण जी गोष्ट माझी आहे असे त्या वेळेस बोलतो त्यावेळेस आपण त्या गोष्टी सोबत जोडले जातो. जस्ट प्रमाणत कोणत्याही व्यक्ती सोबत जास्त प्रमाणत भावनिक टिकून ठेवायचा नाही. दुःखाच्या गोष्टी शक्य होत असेल तर लगेच विकासरुं जायचे.

दुःख हे आपल्याला ज्या व्यक्ती किंवा वस्तू बद्दल संलग्नक (attachment) असते त्यांच्या पासूनच जास्त प्रमाणत दुःख होते. ज्या व्यक्ती किंवा वस्तू बद्दल आपण संलग्नक (attachment) नसतो त्याच्या बद्दल आपल्या कोणत्याच भावना निर्माण होत नाहीत.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.