धार्मिक

आज गुरुवार गुरुपुष्यामृत योग नक्की खरेदी करा ह्या पैकी एक वस्तू, घरात अनंत काळ लक्ष्मी टिकून राहील.

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, आज आहे गुरुवार आणि आज गुरुपुष्यामृत योग देखील आहे. ह्या दिवशी अनेक लोक सोन्याची खरेदी करतात जर तुमची क्षमता असेल तर तुम्ही देखील सोन्याची खरेदी अवश्य करा, कारण ह्या दिवशी खरेदी केलेल्या सोन्यात वाढ होते ते अक्षय टिकते. मात्र प्रेत्येकाला सोने खरेदी करणे जमत नाही. अश्या वेळी सोन्याहुनही मौल्यवान असणाऱ्या अश्या काही वस्तूंची खरेदी आपण करून आपण लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता.

मित्रांनो ह्यातील पहिली वस्तू म्हणजे लक्ष्मी मातेची पाऊले. हि पाऊले आपण आपल्या घराचा जो मुख्य द्वार आहे त्याच्या उबंरठयावर आपण हि लावायची आहेत. जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी आगमन होतील, आणि ज्या घरात माता लक्ष्मी येते त्या घरात सुख समृद्धी व भरभराट होते. सोबतच सार्वधिक प्रिय असणारे यंत्र म्हणजे श्री यंत्र ह्याची खरेदी करून आपण त्याची देखील स्थापना आपण ह्या दिवशी करू शकता. ज्यांना आज वेळ नाही मिळाला तर उद्या शुक्रवार आहे त्या दिवशी देखील आपण ह्या श्री यंत्राची स्थापना आपण केली तरी चालेल.

पैस्यांमध्ये वाढ व्हावी म्हणून आपले दुसरे यंत्र आहे ते म्हणजे लक्ष्मी कुबेर यंत्र हे यंत्र देखील आपण खरेदी करून त्याची विधिवत पूजा करून आपण हे यंत्र आपल्या तिजोरीत ठेवावे. ह्यामुळे धनपती कुबेर प्रसन्न होतात व धन वाढू लागते. गुरुपुष्यामृत योगावर आणखी एक खूप महत्वाची गोष्ट खरेदी करू शकता ती म्हणजे आपल्या मुख्य दारावर लावण्यासाठी स्वस्तिक, ओम किंवा शुभ लाभ असे स्टिकर्स आपल्याला बाजारात सहज मिळतात असे हे स्टिकर्स आपण घराच्या मुख्य दारावर दोन्ही बाजूला लावायचे आहेत, ह्यामुळे घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही.

ह्या दिवशी आपण आपल्या देवघरासाठी देखील काही वस्तू खरेदी करू शकता. एखादे किचन असेल किंवा लॉकेट असेल किंवा कोणतेही मोठी खरेदी करण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. जसे कि घंटी असेल ताम्हण तांब्या असेल अश्या वस्तूंची आपण खरेदी आपण अवश्य करा. तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी चांदीची देवी देवतांचे कॉईन्स असतात लक्ष्मीचे व गणपतीचे असे कॉईन्स आपण खरेदी करावेत. ह्या दिवशी तुम्ही जपमाळ देखील खरेदी करू शकता.

मित्रांनो घरात पैस्याची वाढ होत राहण्यासाठी माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची देखील कृपा असणे आवश्यक असते म्हणून आपण भगवान हरी विष्णूंचे प्रतीक असणारे कासव सुद्धा आपण ह्या दिवशी खरेदी करून घरातील देवघरात स्थापन करा. ह्यामुळे घरात आपल्या पैसा येत राहील. ह्यासोबत ज्यांना वाहन खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी हा दिवस खूप शुभ आहे. नवीन कपडे तसेच, भांडी असतील त्यांची खरेदी देखील आपण ह्या दिवशी करावी.

तर मित्रांनो आजच्या दिवशी तुम्ही वरील सांगितल्यापैकी कोणतेही एक वस्तू खरेदी करू शकता. तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा नक्कीच होईल. तसेच मित्रांनो आजचा लेख जर आवडला असेल तर लेखाला लाईक करा तसेच लेख शेयर देखील करा, धन्यवाद.