लाईफस्टाईल

तुमचे केस गळतात का ?तर नक्की वाचा ,केसांची मुळे मजबूत करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय …

मित्रानो प्रत्येकालाच आपले केस दाट ,काळेभोर आणि लांबसडक असावेत असे वाटत असतात . पण त्या केसांना योग्य ते पोषण मिळाय हवे , त्या केसांची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे तर ते केस चांगले आणि निरोगी राहतील. तसेच आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे केसांच्या मुळे हि मजबूत असली पाहिजे आणि आपण केसांच्या मुळांची जास्त काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो आपण पुढीलप्रमाणे केसांची मुळे मजबूत करण्यासाठीचे आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत.

आपल्या केसांच्या मुळापाशी म्हणजेच डोक्याच्या त्वचेवती तैल ग्रंथी असल्यामुळे आपल्या केसांच्या मुळांचे रक्षण होते. आपले केसात कोंडा होणे, केस तुटणे आणि केसांची स्लॅप खराब होणे या समस्या निर्माण होतात. तसेच हवामान ,वातावरणातील बदल ,आपले आरोग्य आणि वाढते प्रदूषण यामुळे सुद्धा आपल्या केसांचे आरोग्य बिघडते.मित्रानो आपल्या केसांची मुळे मजबूत असले तरच आपले केस निरोगी आणि चांगले राहतील .

केसांची मुळे कमकुवत होणे –
लोह ,कॅल्शियम ,व्हिटॅमिन डी ,झिंक आणि प्रोटीन हे केसांच्या पोषणासाठी खूप महत्वाचे असतात आणि हे जर योग्य प्रमाणात नाही मिळाले तर केसांची मुळे हि कमकुवत होतात. केसांची मुळे कमकुवत झाले कि केस निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात. आपल्या केसांच्या मुळांना जर चांगल्या प्रमाणात रक्त पुरवठा झाला नाही तर केसांचे आरोग्य बिघडते. तसेच हार्मोन्सच संतुलन बिघडणे ,कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढल्यामुळे, आणि जर मधुमेह असेल तर केसांची मुळे जास्त कमजोर होतात. आपण जास्त मसालेदार पदार्थ आणि तेलकट पदार्थ खाल्यामुळे केसांवर परिणाम होतो. तसेच केमिकल युक्त शाम्पू वापरल्यामुळे देखील केसांचे आरोग्य बिघडते.

मित्रानो आपले केस कमकुवत झालेले आहेत हे कसे ओळखावे. केस कमकुवत झाले असतील तर ते हातानी ओढल्यास ते तुटतात.केस खूप निस्तेज आणि कोरडे दिसतात. केस जास्तीत जास्त प्रमाणात गळतात. ह्या प्रकारे केस कमकुवत झाले असतील तर ते ओळखावे आणि लगेच काळजी घेतली पाहिजे.

मित्रानो आयुर्वेदात केस मजबूत बनवण्यासाठी फक्त केसांवर उपचार करून चालत नाही तर व्य्वस्तीत आहार पण घेणं गरजेचं आहे . तेलाने केसांना मालिश केली पाहिजे आणि चांगला केमिकल विरहित शाम्पू लावला पाहिजे. आपण पाहु की केसांसाठी कोण कोणता आहार घेतला पाहिजे.

योग्य आहार घेणे-

मित्रानो आपल्या आहारात प्रोटीन आणि आयर्न हे योग्य प्रमाणात असले पाहिजे. फळे,कडधान्य आणि पालेभाज्या ज्या आहारात घेणे. आहारात ड्राय फ्रुटस चा समावेश करावा . केलेलं आणि तूप हे योग्य प्रमाणात खावे. जास्त तळलेले पदार्थ खुऊ नये. तेलाचा वापर योग्य प्रमाणात करावा. मीठ कमी प्रमाणात खावे. लोणचे आणि सॉस प्रमाणातच खावे.

हेअर मास्क –
केसांना आठवड्यातून एकदा तरी हेअर मास्क लावला पाहिजे. आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे हेअर मास्क कसा बनवायचे ते आपण बघूयात. १)त्रिफळा हेअर मास्क-२ चमचे अँपल विनेगर ,१चमचा तेइफला चूर्ण आणि १ चमचा मध हे एकत्र करून केसांना लावावे आणि अर्ध्या तासांनी केस दजं टाकावे. केसांची मुळे मजबूत होतील. २)कांद्याचा हेअर मास्क-४चमचे मध ,४चमचे कांद्याचा रस आणि थोडीशी काळीमिरी पूड हे एकत्र करून केसांना लावावे आणि अर्ध्या तासांनी केस धुवावे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. ह्या प्रमाणे आवळा पावडर,जास्वंद पावडर,कोरफड,मेथी पावडर हे सुद्धा केसांला मजबूत बनवते.

पोषक पदार्थ –
१)आवळा -आवळा ला केसांसाठी खूप गुणकारी असतो. आवळ्याचा रस घेतल्याने व्हिटॅमिन डी मिळते. २)नारळाचे तेल-केसांना तेलाने नियमित मालिश करावी म्हणजे केस कोरडे नाही होणार. ३)ताक – ताक हे आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. ताक पिल्याने केसांसाठी पोषक असते त्यामुळे दररोज एक ग्लास ताक घेतले पाहिजे. ४)बदाम- बदाम हे रात्री बीजवून सकाळी साल काढून खावेत ते केसांना मजबूत बनवते .आणि आपल्याला प्रोटीन मिळते. तसेच पालेभाज्या, मूळ, मनुके ,आक्रोड हे सुद्धा केसांसाठी योग्य आहेत.

निरोगी केसांसाठी हे टाळावे –
१)योग्य प्रमाणात शाम्पू वापरावा . २)केस दररोज धुणे टाळावे. ३)हेअर ड्रायर चा वापर जास्त करू नये. ४)केमिकल चा वापर कमीच करावा. ५)जागरण करू नये, वेळेवर झोपावे.
अश्या प्रकारे आपण आपल्या केसांची काळजी स्वतः घेऊ शकतो आणि आपले केस मजबूत आणो घनदाट बनवु शकतो . आपला आहार चांगला तर आपलं शरीर निरोगी राहू शकत आणि मजबूत आणि निरोगी केस मिळतता येतील .