नवीन वर्ष २०२३, हे सुख समाधानाचे आणि भरभराटीचे जाईल घरात हे नियम पाळा
लाईफस्टाईल

नवीन वर्ष २०२३, हे सुख समाधानाचे आणि भरभराटीचे जाईल, घरात हे नियम पाळा…

मित्रानो काही दिवसानी नवीन वर्ष सुरु होत आहे. प्रत्येकाला च आपले नवीन वर्ष सुख समाधानाचं आणि भरभराटीचा जावं असं वाटत असत. तसेच येणाऱ्या नवीन वर्षात आपली चांगली प्रगती व्हावी असं सगळ्यांनाच वाटत असतं, त्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात.

मित्रानो २०२३ हे नवीन वर्ष चांगले, भरभराटीचे आणि सुख-समाधानाचे जाण्यासाठी तुम्ही घरात हे नियम पाळा ,हे नियम खालीलप्रमाणे आहेत.मित्रानो खाली सांगितले जाणारे नियम ज्या घरात नियमितपणे पाळले जातील अश्या घरात लक्ष्मी देवीचा आशीर्वाद नेहमी राहणार आहे.

१) मित्रानो २०२३ या नवीन वर्षाच्या सकाळी तुम्ही तुमचे दोन्ही हात डोळ्यासमोर ठेऊन , “कराग्रे वसते लक्ष्मी ,करमध्ये सरस्वती ,करमुळे तू गोविंद,प्रभाते करदर्शनं ” हा श्लोक म्हणून डोळे उघडायचे आहेत, असं तुम्ही रोज सकाळी वर्षभर केले पाहिजे, हे रोज केल्यास माता लक्ष्मी आपल्यावर नेहमीच प्रसन्न राहील. तसेच तुमचा दिवस खूप आनंदी जाईल.

२) मित्रानो तुमच्या घरात लक्ष्मी देवी हि टिकून राहावी यासाठी तुम्ही तुमच्या घरात सकाळ- संध्याकाळ धुप-दीप , उद्बत्ती हि घरात लावली पाहिजे असं केल्यास घर हे प्रसन्न राहते.तसेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. तसेच या दरवाज्याला शुभ- लाभ, स्वस्तिक असे लावा.

३) आपण आपले घर हे रोज स्वच्छ ठेवले पाहिजे असं केल्यास घरातील नेगेटिव्हिटी निघून जाते. तसेच दररोज आपल्या घरातील फारशी हि पुसली पाहिजे ती पुसताना त्या पाण्यात खडे मीठ टाकले पाहिजे , आणि फारशी पुसून घेतली पाहिजे असं केल्यास घर तर स्वच्छ होतच तसेच पॉसिटीविटी निर्माण होते.

४) तुमच्या किचन मध्ये तुम्ही मीठ हे नेहमी काचेचा डब्यात ठेवा . बऱ्याच वेळा मीठ हे प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवले जाते असं कमीत ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होत असतो. जर तुम्ही मीठ हे प्लास्टिक च्या बरणीत ठेवले असल्यास त्या बरणीत फक्त २-४ लवंग ठेवा कि ज्या लवंगाच्या फुल आहे अश्या लवंगा ठेवा, जेणे करून वास्तुदोष निर्माण होणार नाही.

५) तुरटी चे त्रुकडे एका काचेच्या वाटीत घेयचे आहेत आणि ती वाटी आपल्या घराच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये ठेवायची आहे. एक – दोन महिन्यांनी ती तुरटी पाण्यात टाकून द्याची आणि नवीन तुरटी ठेवायची असं केल्यास तुम्हाला खूप फायदा होईल.तसेच हा उपाय केल्याने,,तुरटीमुळे आपल्या घरातील गरिबी दूर होण्यास मदत होते.

६) तुमच्या घरातील झाडू हा लोकांना कोणाला देऊ नका. आपल्या घरातील लक्ष्मी हि निघून जाते.झाडू हा कोणाला दिसेल असं ठेऊ नका. आपल्या घरातील झाडू ला ओलांडू नका, त्या झाडू ला लाथ मारू नका. तो झाडू हा व्यास्तीत ठेवा. आपल्या घरातील जुना किंवा खराब झालेला झाडू हा शनिवार च्या दिवशी घराबाहेर टाका ,तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर होईल.

मित्रानो हे नियम नियमित पणे पाळा म्हणजे २०२३ हे नवीन वर्ष तुम्हाला भरभराटीचा जाईल. तसेच तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेयर करा. तसेच लाईक आणि कंमेन्ट करायला विसरू नका. धन्यवाद !