हृदयासाठी घातक असे बॅड कोलेस्ट्रॉल न वाढवणारे तूप बनवा अश्या पद्धतीने

हृदयातील हानिकारक फॅट्स न वाढवणारे तूप बनवायच्या पद्धती..

मित्रानो आपल्या खादय संस्कृतीत तुपाला खूप महत्व आहे . रोज तूप खाल्याने आपले आरोग्य चांगले राहते.साजूक तूप हे औषधीही असते. साजूक तूप रोज खाल्याने आपले केस चमकदार आणि मजबूत होतात.साजूक तूप रोज खाल्याने आपले पोट हे रोजच्या रोज साफ होण्यास मदत होते. रोज तूप खाल्याने सांधे दुखी चा त्रास कमी होण्यास मदत होते तसेच वात आणि पित्ताचा त्रास देखील कमी होतो. साजूक तूप हे रोज खाल्याने आपली पचनक्रिया चांगली होते. साजूक तूप हे आपल्या चेहऱ्याला लावून मसाज केल्यास , चेहरा चमकदार दिसतो . तूप हे कॅन्सर झालेल्यांसाठी अमृतासारखं काम करते.

१)आपल्या स्वयंपाघरातील महत्वाचा पदार्थ हि हळद आहे आणि आपल्या आरोग्यासाठी हळदीचा खूप उपयोग होतो. आपण हळदीचा वापर फेसपॅक बनवण्यासाठी पण करतो. हळद हि सांधेदुखीवरसुद्धा गुणकारी ठरती . आता आपण हळदयुक्त तूप कास बनवायचं हे बघुयात, एक कप तुपात एक चमचा हळद आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घालून हे तूप हवाबंद बरणीत ठेवा.

२)दालचिनी हि अँटिऑक्सिडेट आहे . दालचिनी मध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास महत्वाची ठरते. दालचिनी हि आपल्या त्वचेच्या सोंदर्य साठी उपयोग होतो. दालचिनीमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टरील असे गुणधर्म आहे. दालचिनीयुक्त तूप हे कास बनवायचं हे आपण पाहणार आहोत . आपण लोणी काढवताना. त्यात दालचिनी टाकून ते काढून घ्याच आहे. आणि नंतर ते गाळून एका बरणीत भरून ठेवा . आपण दालचिनीयूक्त तूप हे अजून एका पद्धतीने बनवू शकतो, एक भाड्यात एक कप तूप घेऊन त्यात दालचिनी च्या काही काड्या टाकून ते तूप पाच मिनिटे उकळून घ्यायचं आहि थंडगार बरणीत भरून ठेवा.

३)लसूण खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सगळ्या आजारावर लसूण हा गुणकारी ठरतो.एक लसूण घेऊन तो सोलून त्याच्या पाकळ्या घ्या आणि एका भांड्यात कप भरून तूप घ्या आणि आपण सोललेल्या लसूनाच्या पाकळ्या चिरून घ्या आणि त्या तुपात टाकून तूप हे पाच मिनिटे मंद गॅसवर उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करून ते भाड्यावर झाकण ठेऊन ते तूप गर झाल्यावर एका बरणीत भरून ठेवा .

४)कपूरची ओळख हि फक्त देवघरापुरतीच नसते,त्याच उपयोग आपल्या आरोग्यासाठी सुद्धा होतो. आपल्याला खाण्यायोग्य असा कापूर हा बाजारात उपलब्ध आहे. कपूर हा पचनासाठी चांगला आहे आणि तो झाडांच्या सालीपासून तयार होतो. कपूर हा सांधेदुखीवर गुणकारी आहे. कपूर हा वेदना देखील कमी करण्याचे काम करतो. जो कपूर खाण्यासाठी योग्य असतो अश्या कापराचे एक दोन तुकडे तुपात टाकून हे तूप पाच मिनिटे उकल आणि ते थंड झाल्यावर गाळून बरणीत भरून ठेवा . हे कापुरयुक्त तूप पित्त कमी करण्याचे काम करते.

५)तुळस हि आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असते. तुळशीच्या पानामध्ये अ ,क आणि सी हि जीवनसत्वे असतात. तुळशीच्या पानामध्ये कॅल्शियम ,पोट्याशियम , फॉसफरस आणि होऊ हे जास्त प्रमाणात असते. तुळस हि आपल्या शरीरातले ग्लुकोज आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. आपण तुळशीयुक्त तूप कसे बनवायचे हे बघुयात, आपण लोणी काढवताना त्यात तुळशीची पाने टाकून लोणी चांगले कढवून घ्यायचे आणि ते तूप चांगले उकळून घायचे म्हणजे म्हणजे तुळशीच्या पानाचा अर्क सगळा त्या तुपात उतरतो आणि आपलें तुळसयुक्त तूप तयार होईल आणि त्या तुपाला तुळशीच्या पानांचा एक छान वास येतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.