मित्रानो लिंबु या फळाची चव हि आंबट असते. लिंबू हे पिकल्यानंतर ते पिवळे दिसते. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिट्यामिन सी ,फायबर ,पोट्याशियम,कॅलसियम असते. लिंबाचा वापर आपण भरपूर पद्धतीने करू शकतो. लिंबाचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो जसे कि, सरबत करू शकतो, लिंबू पाणी , लिंबाचं लोणचं किंवा वरण भातावर लिंबाची फोड चिरून आपण लिंबू खाऊ शकतो.लिंबाची आपण एक तरी फोड रोज खाली तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो.
मित्रांनो लिंबसोबत मध हा आपल्यासाठी खूप गूणकारी आहे. मधा मध्ये आयर्न ,व्हिट्यामिन अ , व्हिट्यामिन क असते. आपण मधाचाही वापर दररोज केला पाहिजे.मधामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तुम्ही दररोज सकाळी एक ग्लास कोमट आणि आणि एक चमचा मध मिक्स करून घेतल्याने आपल्याला अनेक फायदे होतात.
आपण लिंबूपाणी आणि मध याचे कोण कोणते फायदे होतात ते जाणून घेऊयात ,तसेच लिंबूपाणी आणि मध हे बनवण्याची पद्धत जाणून घेऊयात.
लिंबूपाणी आणि मध बनवण्याची पद्धत:-एक ग्लास कोमट पाणी,अर्ध लिंबू आणि एक चमचा मध घेयचा आहे. आता एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध लिंबू मिक्स करून घायच आहे. हे मिश्रण तुम्ही सकाळी घायच आहे. हे मिश्रण डायबिटीस असेल तरी घेतल्यास चालेल. आता आपण हे लिंबू आणि मध घेण्याचे फायदे जाणून घेऊयात.
१)वजन कमी करण्यासाठी;-आपण दररोज सकाळी अनोश्या पोटी कोमट लिंबूपाणी आणि मधाचे मिश्रण प्यायल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. लिंबामध्ये व्हिट्यामिन सी आणि फायबर असल्यामुळे आपली चरबी जाळण्यास मदत होते आणि आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
२)पित्त कमी करते:-लिंबू पाण्याचे रोज सेवन केल्यास पित्त कमी होण्यास मदत होते. तसेच भूक देखील वाढण्यास मदत होते आणि पोट साफ होण्यास मदत होते.
३)पचनशक्ती वाढते:-लिंबू पाणी आणि मध हे रोज घेतल्याने पचनशक्ती सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत करते. आरोग्य निरोगी राहते. हे मिश्रण विषारी पदार्ध बाहेर टाकण्यास मदत मिळते. अन्नपचतें त्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते.
४)सुंदर केसांसाठी :-तुम्हाला जर केस चमकदार आणि तजेलदार बनवायचे असेल तर लिंबाचा रस आणि त्यात थोडस पाणी मिक्स करून केसांच्या मुळांना लावल्यास केस चमकदार होतात असे म्हणतात . परंतु लिंबाचा केसांना वापर हा कमी प्रमाणातच करावा नाहीतर केस खूप कोरडे बनतात.
५)तोंडाची दुर्गंधी कमी:-लिंबू पाणी आणि मध हे पिल्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. आपले तोंड स्वच होण्यास मदत होते. आपल्या जिभेवरचा पांढरा थर कमी करण्यास मदत करते.
६)युरीन इन्फेकशन कमी करते:-मध, लिंबू आणि कोमट पाणी प्यायल्याने आपल्याला शरीराला नको असलेले विषारी घटक बाहेर टाकले जाते. आणि युरीन इन्फेकशन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रोज कमीतकमी एक ग्लास कोमट पम्यात लिंबू आणि मध घालून आपण घेतलेच पाहिजे.
७)उत्साह वाढतो:-दररोज मध आणि लोम्बु पाणी घेतल्याने आपला उत्साह वाढण्यास मदत होते. कोमट पाणी घेतल्याने आपल्या मेंदूला रक्त पुरवठा होण्यास मदत होते. त्यामुळे आपले मन प्रसन्न होते आणि आपली सुस्ती दूर होऊन उत्साह वाढण्यास मदत होते.