आरोग्य

मोहरी व मोहरीच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे.

मित्रांनो आपल्या प्रेत्येकाच्या घरात स्वयंपाक करताना सापडते ती म्हणजे मोहरी. आपण भाजी करताना हि मोहरी नक्की वापरत असाल पण तुम्हाला माहिती आहे कि हि मोहरी आरोग्यदृष्ट्या फार महत्वाची आहे. ह्या मोहरीच्या वापरल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो मोहरीचा सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे आपले वजन नियंत्रित करण्यासाठी.

आजकाल आपण पाहतो कि खुप जणांना लठ्ठपणाचा त्रास आहे, जर आपल्याला वाटत असेल कि आपलेदेखील वजन हे नियंत्रित राहावे कंट्रोल मध्ये राहावे तर आपण सुद्धा हाय मोहरीचा समावेश आपल्या आहारात नक्की करा. कारण असे आहे कि मोहरीचे जर आपण सेवन केले तर आपले मेटाबोलिसम जे आहे ते चांगले राहते. परिणामी आपले वजन वाढत नाही ते कंट्रोल मध्ये राहते.

मित्रांनो ज्यांना लकवा म्हणजेच पॅरालीसिस चा अटॅक आपल्याला येऊ नये असे वाटते त्यांनी देखील आपल्या आहारात ह्याचा समावेश नक्की करावा, त्यामुळे लकवा येण्याचे चान्सेस कमी होतात. कंबरदुखी चा त्रास देखील ह्यामुळे कमी होतो. ज्यांना चिकनगुणिया झालेला आहे हा होऊन गेल्यानंतर सांधेदुखीचा त्रास होतो तर हा त्रास होऊ नये म्हणून आपण मोहरीचे रोजच्या जेवणात सेवन करावे.

मित्रांनो ह्या मोहरीचा सेवन केल्याने आपली पचनक्रिया चांगली बनते आपल्याला पोटाचे विकार कमी होतात, ज्यांना ऍसिडिटी चा त्रास आहे त्यांनी आपल्या आहारात मोहरी वापरावी. मित्रांनो मोहरी तशी तर उष्ण आहे म्हणून ज्यांना वात येतो अश्या लोकांनी मोहरीचे सेवन नक्की करा. संधीवातावरती मोहरीचे तेल हे अत्यंत गुणकारी मानले जाते.

मित्रांनो जर आपले केस जर पांढरे होत चालले असतील तर ह्या पांढरे केस न होऊन देण्यासाठी आपल्या आहारात मोहरी तर वापराच मात्र जे मोहरीचे तेल आहे त्या तेलात आपण थोडा कापूर टाकून त्या तेलाने जर आपल्या केसांची मालिश केली तर केस पांढरे होण्यापासून थांबतात. आपले डोके शांत होते आणि झोपसुद्धा चांगली लागते.

मित्रांनो केसांसाठी मोहरी खूप उपयुक्त आहे, आपल्या चेहऱ्यावरती जर रॅशेस पडले असतील तर आपण थोडेसे मोहरीचे तेल घेऊन त्यात थोडेसे खोबरेल तेल मिक्स करून आपण हे तेल घेऊन आपल्या चेहऱ्याची मसाज करा. मित्रांनो हे जे तेल आहे हे ऍण्टीफ़ंगल तसेच अँटीबॅक्टरीयल आहे परिणामी हे तेल रॅशेस पासून आपले रक्षण करते. मित्रांनो दात साफ करण्यासाठी सुद्धा मोहरीचे तेल खूप उपयुक्त आहे.

तुम्ही मोहरीचे तेल घेऊन जर त्यात थोडेसे मीठ टाकले तर त्यामुळे आपले दात स्वच्छ निगतात आणि आपले दात हे चमकदार बनतात. एकंदरीत आपल्या दातांचे आरोग्य चांगले राहते. ज्यांचा रंग सावळा असेल त्यांनी हे मोहरीचे तेल व खोबरेल तेल मिक्स करून ह्या तेलाने चेहऱ्याची मसाज करा त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. तर मित्रांनो हे होते मोहरीचे फायदे.