नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो पावसाळ्यात केस चिकट होऊन गळतात का, केसांमधून घाण वास येतो. केस खराब असतील तर त्यावर उपाय काय करावेत हे व ह्यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात का. तर आजचा लेख तुमच्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा आहे. मित्रांनो प्रेत्येक ऋतूत एक काळजी लागून राहते आणि ती म्हणजे केसांची. वातावरणातील दमटपणामुळे केसांचे फारच नुकसान होऊन जाते तसेच पावसात भिजल्याने कोंढा होणे व केसगळती ह्यासारख्या समस्या उद्भवू शकतात अश्या वेळी आपल्या केसांची काळजी कशी घ्याची असा प्रश्न पडणे साहजिक आहे.
सतत पार्लर मध्ये जाऊन केसांची काळजी घेणे त्याला तितकाच खर्च देखील करावा लागतो. त्यासाठी घराच्या घरी अगदी स्वस्त आणि मस्त केसांची कशी काळजी घेता येईल तेही पावसाळ्यात त्याबद्दल आपण आजच्या लेखात माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम केस नेहमी कोरडे राहतील ह्याची काळजी घ्यावी. पावसाचे पाणी हे केसांसाठी ऍसिडीक व खराब असते हा तुम्हाला माहिती नसेल म्हणून पावसाच्या पाण्यापासून आपले केस हे दूर राहतील ह्याची काळजी आपण घ्यावी.
पावसात तुमचे केस चांगले ठेवण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय आहे. ह्यासाठी तुम्ही छत्री रेनकोट ह्याचा वापर करा. शिवाय घरी गेल्यावर जर तुम्ही भिजला असाल तर केस कोरडे करा.
आठवड्यातून किमान दोनदा आपण शाम्पू चा वापर करावा, पावसात भिजून आल्यानंतर आपण सर्व खराब पाणी काढून टाकण्यासाठी तुम्ही माईल्ड शाम्पू चा वापर करायला हवा. पावसाळ्यात सर्वात जास्त केस गळतीची समस्या वाढून जाते. तसेच पावसाच्या पाण्याने तुमच्या केसात होणार फँगल आणि बॅक्टरीयल जे इन्फेकशन आहे, शाम्पू चा वापर केला तर तो निघून जातो. नेहमी लक्षात ठेवा कि तुम्ही पावसाळा असो किंवा पावसाळा नसो तुम्ही हर्बल शाम्पूचाच वापर करायला हवा. तुम्ही ह्याशिवाय रिठा आवळा शिकेकाई ह्या गोष्टींचा वापर जरी केला तरी चालतो.
पावसाळ्यात तुमच्या केसांना ऑईल मसाज करण्यासारखा दुसरा कोणताही चांगला ऑपशन नसतो, हि टीप तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण तेलाच्या मसाजमुळे तुमच्या केसांना पोषक पोषण मिळते. बदामाचे तेल किंवा नारळाचे तेल ह्यापैकी कोणतेही एक तेलाने आपण ते थोडे कोमट करून चांगली मसाज करा. आठवड्यातून आपण तीन वेळा हि मसाज करा. ह्यामुळे तुमची केसदाट देखील होतात, पंरतु दुसऱ्या दिवशी सकाळी आपण केस शाम्पू ने चांगली धोईला विसरू नका नाहीतर तुमचे केस जास्त चिकट राहतील व तुमच्या केसातील कोंढा वाढू शकतो.
नैसर्गिक गोष्टींचा वापर तुम्ही केसांवरती करायला शिका,स्ववयंपाक घरातील अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याचा वापर आपण आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी घेण्यासाठी घेऊ शकतो. तुम्ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या गोष्टींचा वापर करायला हवा. अश्या वस्तूंमध्ये रसायने देखील नसतात. शिवाय तुम्ही रिठा, आवळा व शिकेकाई ह्यांचा देखील जास्तीत जास्त वापर करू शकता.
तसेच तुम्ही घरच्या घरी काही हेअर मास्क देखील बनवू शकता व तुम्ही घराच्या घरी केसांची काळजी देखील घेऊ शकता. पावसाळ्यात केस बांधून ठेवणे अजिबात योग्य नाही, ह्यांमुळे केसांत कोंढा तसेच उवा होऊ शकतात. तुम्हाला केस बांधताना एकदम ते मोकळे राहतील ह्याची काळजी घ्या. जितके केस तुम्ही तुम्ही मोकळे ठेवता येतील ह्याची काळजी घ्या. तर ह्या होत्या काही खास टिप्स ज्या तुम्ही नक्की फॉलो करा. मित्रांनो आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. तसेच हि माहिती अनेक लोकांपर्यंत शेयर देखील करा.