धार्मिक

लहान मुलांचे बोरन्हाण म्हणजे काय आणि कसे केले जाते , जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मित्रांनो वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांत साजरी केली जाते, तसेच या सणाला आपण सगळ्यांना तिळगुळ देतो आणि त्यांना आपण “तिळगुळ घ्या ,गोड गोड बोला”असे म्हणतो.बाळाची आपल्या सुस्कृतीशीं ओळख ह्यावी म्हणून पण बोरन्हाण केलं जात.

मकरसंक्रांत आली कि सगळे आपल्या घरातील लहान मुलांना म्हणजेच पाच वर्षा पर्यंतच्या मुलांना बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे ,असे म्हटले जाते कि या काळात जर लहान मुलांना बोरन्हाण घातले तर त्यांना बदलत्या ऋतू चा त्रास कमी होतो. तसेच बाळाची आपल्या सुस्कृतीशीं ओळख ह्यावी म्हणून पण बोरन्हाण केलं जात.

मित्रानो बोरन्हाण म्हणजे काय ,ते कसे केले जाते आणि त्याची संपूर्ण माहिती हि आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात.

मित्रांनो लहान मुलांचे आरोग्याच्या दृष्टीने बोरन्हाण हे घातले जाते.बाळ जन्मल्यानंतर त्याची पहिली संक्रांत आली कि त्या वर्षीपासून पाच वर्षे बोरन्हाण केलं जात.तसेच नवीन लग्न झालेल्या नवविवाहित जोडप्याच्या पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालून त्यांची पहिली संक्रांत हि साजरी केली जाते.

लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून त्यांच्यावर बोर,चुरमुरे ,उसाचे तुकडे,हरभरा ,भुईमुगाच्या शेंगा आणि तुम्हाला हवी आहेत तेवढी चॉकलेट्स ,बिस्किट्स ,लेमन गोळ्या असे सगळे घालून बाळाचे बोरन्हाण करतात.तसेच संक्रांतीला बाळाला काळे कपडे घालण्याची प्रथा आहे.बोरन्हाण हे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत घालता येते.

मित्रानो आता मात्र बोरन्हाण यात खूप बदल झालेला दिसतो. आता बोरन्हाण हा एक इव्हेंटचं झाला आहे. बोरन्हाण करताना खूप अशी सजावट ,भरपूर नातेवाईक,भरपूर आणि वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स ,दागिने अश्या प्रकारे साजरा होताना दिसत आहे. बोरन्हाण हा एक ट्रेंड च झाला आहे.