हनुमान जयंती बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती
धार्मिक

हनुमान जयंती बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मित्रांनो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्ष्यात हनुमान जयंती हि साजरी केली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात सूर्योदयापूर्वीच कीर्तन हे चालू असते. तसेच हनुमानाचा जन्म हा सूर्योदयाला साजरा केला जातो.कीर्तन संपले आणि हनुमानाचा जन्म झाला कि सगळ्यांना प्रसाद हा मिळतो. हनुमान हा रामाचा परमभक्त आहे. तसेच हनुमानाला मारुती असेही म्हणतात.

हिंदू धर्मात हनुमान जयंती हि मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हनुमान जयंतीला मारुतीला तेल,रुईचे फुल,पाणी आणि शेंदूर असे सगळे अर्पण केलेले जाते.हनुमानाचे भक्त हे सकाळी लवकरच मंदिरात जाऊन प्रार्थना करतात.तसेच फुल,फळ,मिठाई असे सगळे अर्पण करतात.

मित्रांनो ह्यावर्षी हनुमान जयंती हि मंगळवारी २३ एप्रिल २०२४ ला पहाटे ३. ३५ ला सुरु होऊन २४ एप्रिल ला पहाटे ५.१८ ला समाप्त होणार आहे. यावर्षी हनुमान जयंती हि मंगळवारी आली आहे.यावर्षी हनुमान जयंती हि मंगळवारी आली आहे. भारतात मंगळवार आणि शनिवार हे पूजेसाठी शुभ दिवस मानले जातात. हनुमानाचा जन्म हा नाशिक जिल्यात अंजिनेरी येथे झाला आहे.हनुमान हा अंजनी आणि केसरीचा यांचा पुत्र आहे.

हनुमान जयंतीचा उपवास हा हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी केला जातो.तसेच घर स्वच करून हनुमानाचा फोटो ची मनोभावाने पूजा केली जाते.हनुमानाला नैवेद्य म्हणून केळी किंवा मिठाई दिली जाते. तसेच हनुमान चालिसा चे पठाण केले जाते.तसेच हनुमानाची आरती केली जाते आणि हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी हनुमान जन्म साजरा करून उपवास सोडला जातो.

हनुमान हे शक्ती आणि स्पृतीचे प्रतीक मानले जाते. तसेच हनुमानाचे रोज दर्शन घेतले पाहिजे ,जर रोज जमत नसेल तर मंगळवार आणि शनिवारी घ्यावे. तसेच ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी तर नियमित दर्शन घ्यावे. तसेच शनिवारी मारुतीला काळे उडीद आणि गुळ अर्पण करावा. तुम्हाला साडेसातीचा कमी त्रास होईल.