खारका ज्यांना लोक सुके खजूर ह्या नावाने देखील ओळखतात. कारण खजुरांना वाळवूनच ह्या खारका बनवतात. खारकेचे लाडू हे खाण्यासाठी खूप चविष्ठ असतात तसेच ते खूप पौष्ठिक देखील असतात. ह्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे हे लवकर खराब होत नाहीत. तुम्ही त्यांना एकदा बनवून ठेवले कि ते खूप दिवसांपर्यंत खाऊ शकता. ह्या लाडू मध्ये खारकेसोबत आणखी काही ड्राय फ्रुटस देखील असतात ह्यामुळे हे लाडू जास्त पौष्ठिक बनतात. ह्या लाडूला तुम्ही अगदी घरी सोप्या पद्दतीने बनवू शकता, चला तर जाणून घेऊयात ह्या लाडूला बनवायची कृती त्याला लागणारे साहित्याचे प्रमाण.
लाडवाला लागणारे साहित्य प्रमाणानुसार:
खारका १ कप भरून किंवा तुम्ही त्याची पूड देखील वापरू शकता जी आजकाल सहज बाजरात उपलब्ध असते. त्यानंतर साजूक तूप अर्धा कप, मखाना ज्यालाच काही लोक पांढऱ्या लाह्या देखील म्हणतात आम्ही त्याचा फोटो खाली दिला आहे ह्याला इंग्लिश मध्ये fox nut असे देखील नाव आहे. त्यानंतर खिसलेले वाळलेले खोबरे २०० ग्रॅम, खरबूजाच्या बिया (Muskmelon seeds) दोन छोटे चमचे, कापलेले काजू १५, मनुका (Raisins), इलायची पॉवडर १ छोटा चमचा, साखर १ कप किंवा तुम्ही गूळ देखील वापरू शकता, पाणी अर्धा कप.
लाडू बनवण्याची कृती:
लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम खारकांना तुम्ही पाण्यात भिजत ठेवा साधारण १ तास आपण ह्या भिजत ठेवा त्यानंतर आपण त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या, आता गॅस वरती कढई मध्ये तूप टाकून गरम करायला ठेवून द्या त्यानंतर त्यात आपण ज्या मखाना घेतला आहे तेवढा सर्व आपण त्यात तुपात चांगले कुरकुरीत होईपर्यँत भाजून घ्या. ह्यानंतर भाजलेला मखना एका प्लेट मध्ये काढून घ्या व त्याला थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याला एका वाटीने चांगले चुरून घ्या व त्याचा भुगा बनवा.
कढईत एक चमचा तूप टाका व त्याला गरम करून घ्या, त्यात सुख्या खिसलेला नारळाचा खिस टाका व तो मंद आचेवर भाजून घ्या, त्याला सोनेरी रंग येऊपर्यंत भाजा व नंतर एका प्लेट मध्ये ते देखील काढून घ्या. ह्यानंतर मिक्सर च्या भांड्यात थोडासा भाजेलेले खोबऱ्याचा खिस काढून बाकीचे सर्व बारीक करून घ्या, त्यानंतर कढई मध्ये तूप टाकून गरम करून त्यात खरबूजाच्या बिया भाजून घ्या त्यानंतर ते काढून त्यातच आपण कापलेले काजू, मनुके देखील भाजून घ्या व सर्व आपण एका प्लेट मध्ये काढून घ्या.
आता साखरेचा पाक बनवण्यासाठी एका पॅन मध्ये साखर एक कप व अर्धा कप पाणी अश्या मापाने सर्व एकत्र घेऊन साखर चांगली पाण्यात मिक्स होऊन वितळून घ्या त्याचा पाक होईल ते आपण तार काढून पहा जेणेकरून समजेल कि आपला पाक झाला आहे. त्यानंतर आपला पाक थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्या. आता आपण एका मोठे भांडे घेऊन त्यात सर्व भाजलेले सर्व पदार्थ मिसळून एकत्र करा नंतर आपण त्यात इलायची पावडर वरून टाका व सगळे एकजीव करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण आपण पाकात टाका.
त्यानंतर ह्या पाकात मिक्स झालेल्या मिश्रणाचे गोल गोल लाडू बनवा. सर्व लाडू बनवून झाल्यानंतर आपण ते थोड्या वेळ वरतीच मोकळ्या हवेत ठेवा जेणेकरून ते थोडे टाइट होतील, घट्ट होतील. त्यानंतर आपण हे लाडू एका कोरड्या डब्यात साठवून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला गॉड खायची इच्छा होईल तेव्हा हे लाडू तुम्ही खा.
लाडू बनवताना घ्याची काळजी व खास टिप्स:
लाडू बनवताना देशी तुपाचा वापर करा जेणेकरून लाडूला चव खूप छान येईल, जर लाडूचे मिश्रण लाडू बनवताना कोरडे पडत असेल तर तुम्ही त्यात थोडे तूप घाला जेणेकरून तुमचे लाडू नीट बांधले जातील. सर्व गोष्टी भाजताना आपण त्या मंद आचेवर गॅस करून भाजा गॅस मोठा ठेवून भाजू नका. लाडूसाठी पाक बनवताना त्याला एक तार येऊन द्या एक तारेचा पाकात लाडू छान बनतात.
तर मित्रांनो आमची आजची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा व आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा कशी झाली ते, तसेच आजचा लेख सर्वाना शेयर करा, धन्यवाद.