जुलाब आणि पोट दुखी साठी घरगुती उपाय.
घरगुती उपाय

पोट दुःखी आणि जुलाब या साठी घरगुती उपाय.

आपल्या देशात नेहमी ऋतू बदलतात यामुळे सुद्धा बरेच आजार होतात. त्यातून जर का पावसाळा सुरू झाला कि अनेक आजार सुरू होतात. कारण पावसाळ्यामुळे बाहेरचे अन्न खाल्यामुळे अनेक पोटा संबंधी आजार होतात. तसेच बऱ्याच ठिकाणी दूषित पाणी पिल्याने सुद्धा पोटा संबंधी आजार होतात. आज आपण असे घरुगुती उपाय पहाणार आहोत ज्यामुळे पोटा संबंधी काही समस्या होणार असले तर ती नक्की कमी होईल.

पावसाळ्यात अनेक प्रकारचे रोग नेहमी वाढताना दिसून येतात. कारण पावसाळ्यात मुबलक प्रमाणात ऊन येत नाही. संपूर्ण पावसाळ्यात बऱ्याच प्रमाणात ढगाळ वातावरण असते अशा वातावरणामध्ये संसर्ग करणारे जंत आपल्या शरीरात जातात तसेच पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी दूषित पाणी पिण्यात येते, तसेच वितरणात ओलावा असल्यामुळे लवकर अन्न खराब सुद्धा होते असे अन्न सेवन केल्यामुळे खुप लोकांना पोटा संबंधी आजार होताना दिसुन येतात. पावसाळ्यात आजारी पडण्याचे जास्त मोठेकारण म्हणजे जंतू निर्माण होण्यसाठी पोषक वातावरण असणे.

घरगुती उपाय पोट दुःखी आणि जुलाब या साठी.

पोट दुखी किंवा जुलाब प्रामुख्याने योग्य अन्नाचे सेवन न करणे होय तसेच काही लोकांना अन्नाचे पचन योग्य प्रकारे न होणे यामुळे सुद्धा पोट दुखी आणि जुलाब होतात. अशावेळी खुप सोपे उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकतात. तसेच या उपाय मुळे कोणतेही दुष्परिणाम तुम्हाला होणार नाही. तर पहिला उपाय आहे. पुदीना, मध, आणि लिंबाचा रस एकत्र करून कोमट पाण्यात मिक्स करून याचे सेवन करू शतकतात दिवसातून दोन ते तीन वेळा.

दुसरा उपाय एक ग्लास ताक घ्या. मीठ , थोडी हळद (चिमूट भर) ,आणि सुंठ पवडर हे सर्व एकत्र करून घ्या आणि दिवसातून दोन वेळा घ्या. यामुळे पोट दुखी तर थांबेल शिवाय जुलाब सुद्धा कमी होतील. तसेच जुलाबामुळे शरीरातील पाणी खुप कमी होते असा वेळी जास्तीत जास्त प्रमाणत पाणी आपल्या शरीरात जाईल याची काळजी घ्यावी तसेच पोट दुखत असेल तर काही प्रमाणत आपला आहार बददलावा. लिबू शरबत, नारळपाणी तसेच फळांचे ज्युस करून प्यावे.

हे पण वाचा :- गरम पाणी पिण्याचे फायदे. दहा आरोग्यदायी फायदे

आधीच्या काळी असे सुद्धा सांगितले जायचे कि पोट आणि जुलाब होत असेल तर साबुदाण्याची खीर खावी. साबुदाण्यात पोटॅशिम, मॅग्नेशिम आणि कॅल्शियम प्रामुख्याने तीन गोष्टी असतात. यामुळे शरीरातील इलेक्ट्रॉल कमी होत नाही तसेच शरीरातील पाणी कमी होत नाही. यामुळे पोट दुखी आणि जुलाबा मुळे येणार थकवा अजिबात जाणवत नाही.

कोरी कॉफी करा त्यात लिंबु पिळा त्याच्यात साखर टाकायची आणि हे सर्व संमिश्रण चहा सारखे प्याचे आहे. या सोबत जर का पोट दुखत असेल तर काय खावे आणि काय खाऊनये. पोट दुखत आले तर गरम भात तूप पेष्ट करून खायचे आहे. तसेच दही सुद्धा खायचे आहे. पचनासाठी जड असणारे पदार्थ चुकून सुद्धा खायचे नाही. हे छोटेसे उपाय तुम्ही नक्की करून पहा यामुळे तुम्हला नक्की आराम मिळेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.