हिवाळा सुरु झाला कि सगळ्यांना कोरडी पडणारी त्वचा हा एकच प्रश्न निर्माण होतो. हिवाळा सुरु झाला कि आपल्या त्वचेतला ओलावा कमी होतो आणि आपली त्वचा हि कोरडी, निस्तेज आणि सुरकुत्या पडल्यासारखी दिसायला लागते.प्रत्येकालाच वाटत असते कि आपली त्वचा सुंदर असावी , यासाठी तुम्ही घरगुती उपाय वापरून तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.
१)हिवाळ्यात नियमितपणे गरम पाण्याने चेहरा धुणे टाळा असं केल्यास तुमचा चेहरा काळपट दिसायला लागतो. त्यापेक्षा तुम्ही तोड्या कोमट किंवा थंड पाण्याने तुम्हा चेहरा धुवावा असं केल्यास तुमची त्वचाही कोरडी पडणार नाही.
२)कोरफड हि आपल्या त्वचेसाठी चांगली असते, त्यामुळे रात्री झोपताना तुम्ही कोरफडीचा गर चेहऱ्याला लावावा, असं केल्यास तुमची त्वचा हि कोरडी पडणार नाही कारण कोरफड हि तुमच्या त्वचेमध्ये ओलावा निर्माण करत असते.
३)हिवाळ्यात त्वचा हि जास्त कोरडी पडत असल्यामुळे रात्री झोपताना तुम्ही जर खोबरेल तेल लावून झोपलात तर तुमची त्वचा हि कोरडी पडणार नाही , तसेच तुमची त्वचा हि मुलायम आणि तजेलदार दिसायला लागते.
४)मित्रानो हिवाळ्यात खोबरेल तेल प्रमाणेच तुम्ही बदामाचे तेल हे रात्री झोपण्यापूर्वी तेल हे हलक्या हातानी मालिश करून लावू शकता असं केल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळेल. तसेच तुमची त्वचेतील ओलावा टिकून राहील.
५)हिवाळ्यामध्ये नेहमी हर्बलयुक्त साबणाचा वापर करावा,केमिकल युक्त साबण वापरल्यास त्वचा हि जास्त प्रमाणात कोरडी पडते, तसेच आपण जास्त गरम पाण्याचा वापर करू नये असं केल्यास आपली त्वचा हि जास्त कोरडी बनते. त्यामुळे अंघोळ करताना कोमट पाण्याचा वापर करावा.
६)हिवाळ्यात अंघोळ झाल्यावर लगेच बॉडी लोशन चा वापर करावा. असं केल्यास त्वचा हि कोरडी होत नाही.
मित्रानो हिवाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी कशी घायची आणि कोरड्या त्वचेसाठीचे घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगितले आहेत. ते उपाय तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कंमेन्ट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे अजून काही उपाय असले तर तेही आम्हाला कंमेन्ट करून सागा. धन्यवाद.