घरगुती उपाय

चेहऱ्यावरील वांग कायमचे नाहीसे करण्यासाठी घरगुती उपाय..

मित्रानो प्रत्येकालाच आपल्या शरीराची काळजी हि असतेच, त्यातूनच आपला चेहरा हि एक वेगळी ओळख असते. त्यामुळे प्रत्येक जण आपला चेहरा सुंदर आणि स्वच्छ दिसावा यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो. मात्र बऱ्याच जणांना वांग या त्वचेच्या संमसेला सामोरे जावे लागते.ज्यात चेहऱ्यावर डाग दिसू लागतात.

मित्रानो तुम्हाला या त्वचेच्या संमसेवर मी आज घरगुती असे उपाय सांगणार आहे. पहिल्यांदा आपण वांग म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊयात.

वांग म्हणजे काय?

प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर हवा असतो, परंतु या आजकाल च्या धकाधकीच्या जीवनात स्वतःची काळजी घेता येत नाही तसेच ताणतणाव आणि प्रदूषण यामुळे त्वचेला विविध संमसेला सामोरे जावे लागते.हयातीलंच एक म्हणजे चेहऱ्यावरची त्वचा हि डार्क स्पॉट दिसू लागतात यालाच वांग असे म्हणतात. तसेच चाऱ्यावर काळे डाग आणि चट्टे दिसू लागतात.

मित्रानो आता आपण वांग वरचे घरगुती उपाय बघुयात.

१) लिंबाचा रस :-तुमच्या चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी लिंबू हे अधिक चांगले काम करते.त्यासाठी तुम्हाला दोन चमचे लिंबाचा रस आणि मध मिक्स करून तुमच्या चेहऱ्याला लावायचा आहे आणि १५ मिनिटांनी तुमचा चेहरा हा कोमट पाण्याने धुवायचा आहे.हे मध आणि लिंबाच्या रसच मिश्रण रोज लावायचं आहे आणि असं रोज केल्यास तुम्हाला फरक दसु लागेल.

२)कोरफड:-कोरफड हि आपल्या त्वचेसाठी खूप गुणकारी असते. कोरफडीचा गर आणि मध एकत्र मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण व्यवस्तीत लावून घ्या आणि ते वाळल्यावर धुवून टाका , असं तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करायच आहे , यामुळे तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

३)दही :-एका वाटीत दोन चमचे दही देऊन ते चेहऱ्यावर लावून घ्या आणि दही वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. दही हे चेहऱ्यासाठी खूप गुणकारी असतो आणि दही हे आपल्या घरी सहज उपलब्ध असत.

४)बटाटा :-बटाटा खिसुन त्या बटाट्याचा रस हा त्या वांग आलेल्या जागेवर लावा आणि १० मिनिटांनी चेहरा हा कोमट पाण्याने धुवून टाका. हे तुम्ही महिन्यातून दोन- तीन वेळा करा तुम्हाला फरक नक्की जाणवेल.

५)केळ :-केळ घेऊन ते कुस्करून घ्या आणि ती केळाची पेस्ट तुमच्या वांग असलेल्या जागी लावा आणि ते तसेच अर्धा तास राहू द्या .तो लावलेला केळाचा पॅक पूर्णपणे सुकल्यावर तो कोमट पाण्याने धुवा.

मित्रानो हे वागवरचे घरगुती उपाय तुम्ही करून बघा आणि हे उपाय केल्यावर तुमचा चेहरा चमकदार आणि फ्रेश दिसू लागेल.हि माहिती तुमहाला आवडली असेल तर लाईक आणि शेयर करा आणि आम्हाला कंमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद…