आरोग्य घरगुती उपाय

घरच्या घरी हेअर स्पा कसा करायचाय ? अगदी कमी खर्चात ??

मित्रांनो प्रत्येकालाच वाटत असत कि आपले केस छान ,मजबुत ,चमकदार आणि निरोगी असावेत. त्यासाठी आपण आपल्या केसांची काळजी घेतली पाहिजे.तसेच तुम्ही तुमचा आहार देखील व्यवस्थित घेतला पाहिजे.तुम्ही तुमच्या केसांना नियमित तेल लावले पाहिजे आणि केसांना मालिश केले पाहिजे.

केसांसाठी आजकाल हेअर स्पा देखील केला जातो आणि पार्लर मध्ये जाऊन हेअर स्पा करणे याचा ट्रेंण्ड आहे. पण बऱ्याच लोकांना पार्लर मध्ये जाऊन हेअर स्पा करणे त्यांच्या खिश्याला परवडत नाही .हेअर स्पाची किंमत देखील जास्त असते आणि हेअर स्पा एकदा करून चालत नाही तो महिन्यातून दोनदा असं नियमित करावा लागतो असं केलं तर त्याचा फायदा होऊन आपले केस मजबूत आणि चमकदार होतात.

हेअर स्पा करण्याचे फायदे खूप आहेत. हेअर स्पा हा नियमित केल्याने केसांची वाढ व्यवसित होते. केसांना योग्य असे पोषण मिळते. केस निरोगी राहण्यास मदत होते.निरोगी आणि निस्तेज झालेले केस छान ,मजबूत आणि चमकदार होतात. त्यामुळे हेअर स्पा हा नियमित करावा.

घरच्या घरी हेअर स्पा करण्याची पद्धत आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.घरच्या घरी हेअर स्पा करण्यासाठी या पाच गोष्टीची आवशक्यता असते. हेअर ऑइल ,स्टिम ,कॅन्डिशनर ,शाम्पू ,घरी बनवलेला हेअर मास्क या पाच गोष्टीची आवशक्यता असते.

१)केसांना तेल मालिश:-एका वाटीत नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल घेऊन ते थोडं कोमट करून मग केसांना लावून घेयचा आहे. त्या नंतर केसांना छान बोटांनी मसाज करायचा आहे . मसाज हा १० ते १५ मिनिटे करायचा आहे.केसांना असे नियमित तेल लावल्याने के निरोगी होतात.

२)केसांना वाफ :-केसांना मसाज करून झाल्यावर एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यात जाड टॉवेल बुडवून घट्ट पिळून मग केसांना बांधून घ्या. तो टॉवेल तसाच ५-८ मिनिटे राहू द्या. केसांना वाफ दिल्यावर केसांना लावलेले तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते आणि तेल छान केसात मुरते.

३)हेअर स्पा मास्क :-आपण आता घरच्या घरी हेअर स्पा मास्क तयार करणार आहे. त्यासाठी २-३ चमचे तांदूळ घेऊन त्याचा मऊ असा भात शिजवून घेयचा त्या भातात २ चमचे ऍलोवेरा जेल आणि २ चमचे दही टाकून मिक्सर मधून बारीक अशी पेस्ट बनून घेऊन ती केसं लावून घेयची . केसांना हा हेअर स्पा मास्क लावून झाल्यावर केसांना केस वर बांधून केसांना के कॅरीबॅग बांधून अर्धा तास हा मास्क असाच ठेवायचा आणि मग केस स्वच्छ धून घ्या. तुम्ही हेअर मास्क हा तुमच्या केसांच्या लांबी नुसार वाढवू शकता.

४)केस धुवून घेयचे:-केस स्वच्छ माईल्ड शाम्पू लावून केस धुवून घेयचे.केस हे गरम पाणी न वापरता थंड पाण्यानी धुतले तर खूप चांगले.

५)कनडिशनर :-केसांना स्वच्छ धुवून झाल्यावर त्या केसांना कनडिशनर लावा.केसांना तुम्ही नियमित वापरता ते कनडिशनर लावले तरी चालते.आपण हेअर मास्क मध्ये दही टाकल्यामुळे ते दही देखील कनडिशनर च काम करत त्यामुळे कनडिशनर लावल नाही तरी काही हरकत नाही.केस धुवून झाल्यावर मात्र तुम्ही केस थोडे वाळल्यावर त्याला एलोवेरा जेल थोडस लावेल तर तुमचे केस चमकदार होतात.

तर अश्या प्रकारे घरच्या घरी या पद्धतीने हेअर स्पा करून बघा आणि आम्हाला कंमेन्ट करून नक्की सांगा आणि तुमच्या केसांना हेअर स्पा चा नक्की खूप फायदा होईल.