आरटीईच्या २०२४-२०२५ प्रवेशासाठी अर्ज कसा करावा ? याबद्दल संपूर्ण माहिती...
Uncategorized

आरटीईच्या २०२४-२०२५ प्रवेशासाठी अर्ज कसा करावा ? याबद्दल संपूर्ण माहिती…

मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आरटीई (RTE Admission 2024-25 Maharashtra) चा २५% प्रवेश प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शालेय शिक्षण पद्धतीनुसार जानेवारीतच हि प्रवेशप्रक्रिया होत असते. परंतु या आरटीई च्या फॉर्म मध्ये काही नवीन नियम ऍड केल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला आहे. २०२४-२०२५ या वर्षासाठी सामाजिक, दुर्बल,मागासवर्गीय मुलांसाठी अंतर्गत २५% राखीव जागासाठी हि प्रक्रिया राबवण्यात येत असते.

आरटीईच्या (RTE Admission 2024-25 Maharashtra) अंतर्गत २५% जागांसाठी १६ एप्रिल या दिवशीपासून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.या वर्षी या प्रवेशप्रक्रियेला दोन महिने उशीर झाला आहे. परंतु आता या आरटीई च्या प्रवेशासाठी लवकरात लवकर अर्ज केला पाहिजे. या प्रवेशासाठी ची माहितीही घेतली पाहिजे. या मधला दिड महिना हा शाळांची नोंदणी करण्याकरिता लागलेला आहे.

आरटीईच्या २०२४-२०२५ प्रवेशासाठी अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे पाहुयात .

मित्रानो सगळ्यात आधी आपण RTE Admission Maharashtra या वेबसाईट ला चेक करावे लागेल.त्यासाठीhttps://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login हि वेबसाईट आहे.

आता online अर्ज वर क्लिक करा.

नवीन नोंदणी या लिंकवर क्लिक करावे लागेल.

आता अर्ज भरायचा आहे ,त्यात मुलाचे नाव,त्याची जन्मतारीख ,ई-मेल id ,address ,मोबाइलला नंबर हे योग्यरीत्या भरायचे आहे.

आता तुम्ही नोंदणी बटन वर क्लिक करा.

आता तुमची सगळी माहिती चेक करून लागणारी कागदपत्रे अपलोड करा.
आता पुन्हा तुमचा अर्ज चेक करून submit करा.

मित्रानो वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही RTE चा अर्ज भरू शकता .