घरगुती उपाय

फुफ्फुसांचा संसर्ग कसा ओळखाल व त्यावर घरगुती उपाय.

फुफ्फुसात संसर्ग झाला असेल तर छातीती दुखणे, खोकला येणे, चक्कर आल्यासारखे वाटणे या सारखे आजार होत असतात. छातीत कफ होणे किंवा फुफ्फुसात संसर्ग होणे यावर आपण खुप प्रकारचे औषध घेत असतो. पण घरगुती औषध घेतल्याने सुद्धा छातीत असलेला कफ सुद्धा कमी होण्यास मदत होत असते. अशे बरेच घरगुती उपाय आहेत ते पण केल्याने छातीतील संसर्ग, कफ किंवा कधी कधी होणारे इतर वेदना कमी होण्यास मदत होत असते. घरगुती उपाय म्हणजेच आजीबाईचा बटवा हे नाव थोडे प्रचलित आहे. तर जाणून घेऊ आजीबाई बटवा मधील काही पदार्थ.

छातीतील दुःख असेल, छातीतील कफ झाला असेल किंवा फुफ्फुसात संसर्ग झाल असेल तर त्याची लक्षणे कोणती ती कशी ओळखावी त्यावर घरगुती उपाय काय आहे. हे पण आज जाणून घेणार आहोत.

फुफ्फुसांचा संसर्ग म्हणजे काय.

छातीत होणारे संसर्ग हे श्वसनाशी निगडित असते. यात फुफ्फुसात देखील समावेश असतो. तसेस यात निमोनिया या सारख्या आजारच समावेश असतो. हे आजार बाहेरील संसर्गमुळे होऊ शकतात, किंवा इतर जिवाणू मुळे सुद्धा संसर्ग होऊ शकतो. हे आजार श्वसनाशी आल्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा जर परसण्याशी शक्यता असते, कारण संसर्ग झलेला व्यक्ती खोकला येणे, सर्दी मुळे शिका येणे किंवा बारीक थुकीच्या संपर्कात इतर व्यक्ती आला असेल तर त्याला संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे संसर्ग झलेल्या व्यक्तीने काळजी घेण्याची गरज असते, खोकताना, शिकताना तोंड झाकून घेण्याची गरज आहे.

जास्त वयस्कर असलेल्या व्यक्ती, शुगर असलेल्या व्यक्ती, लहान मुले, या व्यक्ती ना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. मग जर संसर्ग झाला असेल तर त्या व्यक्तीला कोणती लक्षणे दिसून येतात या बदल जाणून घेऊ.

फुफ्फुसात संसर्ग झलेलाय व्यक्तीची लसने.

फुफ्फुसां संसर्ग झालेल्या व्यक्ती मध्ये कोणती लक्षणे दिसून येतात हे पाहू. या व्यक्तीना श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, डोके दुखणे, भूक कमी लागते किंवा जेवण जात नाही, छातीत गरगर होणे, सारखा थकवा येणे, चिडचिडे पण, सारखा ताप येणे यासारखे लक्षणे दिसून येतात.

संसर्ग कमी करण्यासाठी उपाय

गरम पाण्याची वाफ, गरम पाण्याची वाफ घेतल्याने छातीतील कफ मोकळा होऊन श्वाना ची क्रिया मोकळी होऊ शकते. दुसरा उपाय आहे हळद. घसा दुखत असे तर एक ग्लास गरम पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा हळद घेणे. तसेच दुधा मध्ये सुद्धा हळद टाकून पिऊ शकतात. तिसरा उपाय आहे आले. आले हे खुप गुणकारी पदार्थ आहे. आल्याचा उपयोग खुप वेगळ्या आजारावर उपयोग सुद्धा केला जातो. आल्याचा रस आणि मध मिक्स करून दिवसातून सोन ते तीन वेळेस घेतले तरी चालेल तसेच आल्याचा चहा घेतला तरी चालेल..

अजून एक उपाय पाहू, कांद्या मध्ये असलेले मायक्रो बॉयल घटक छातीत झलेले संसर्ग कमी कण्यासाठी मदत करतात. एक ग्लास गरम पाणी घेऊन लिबचा रस घेऊन त्यात कांद्याचा रस टाका हे सम प्रमाणत घ्या, पाणी थोडे कोमट झल्यावर त्यात थोडे मध टाका. हा रस दिवसातून दोन ते तीन वेळा घेऊ शकतात. यामुळे कफ मोकळा हाणून अन्न प्रक्रिया सुरळीत होते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या