शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाले कि नाही कसे ओळखावे.
आरोग्य

शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाले कि नाही कसे ओळखावे.

आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाले कि नाही समजण्यासाठी काही काही टिप्स बद्दल जाणून घेणार आहोत. हिमोग्लोबिन हे शरीरातील महत्वाच्या घटका पैकी एक आहे. जर का शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाले तर आपल्याला लगेच त्याचे परिमाण आपल्या शरीरावर दिसून येतात. रक्तांच्या पेशी मधला लोहयुक्त घटक म्हणजे हिमोग्लोबिन होय. लोहाचे शरीरातील प्रमाण चांगले असणे खुप महत्वाचे आहे.

जर का शरीरातील लोहाचे प्रमाण कमी जास्त झाले तर त्याचा सरळ परिणाम आपल्या रक्तीची हिमोग्लोबिन वर होतो. जर का हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर आपल्याला अनेक शारीरिक समस्या जाणवू शकतात. त्याच सोबत लोह कमी झल्यामुळे लाल पेशी कमी होतात. हिमोग्लोबिन हे आपल्या शरीरात एक प्रकारचे प्रथिनेचे काम करतात.

हिमोग्लोबिन कमी झाले तर आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती जर कमी झाली तर आजाराला निमंत्रणच दिले जाते. हिमोग्लोबिन कमी झाल्यास आपण कसे ओळखायचे त्याची लक्षणे कोणती आहेत. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन प्रमाण कमी झल्यास सर्वात मोठे लक्षण दिसून येते ते म्हणजे थकवा जाणवणे. थोडे सुद्धा काम केले तरी लगेच आपले शरीर थकते. त्याच सोबत त्वचेवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो. त्वचेचा कलर फिकट पाढंरा दिसून येतो. त्याच सोबत खुप चिडचिड होते आणि आपली विचार करण्याची शक्ती कमी होते. कितीही अराम केला तरी थकवा जात नाही.

आपली त्वचावर जर तेज पणा असतो तो कमी होतो. तसेच इतर अवयांवर सुद्धा अनेक वेगळे परिणाम दिसून येतात जेव्हा आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते तेव्हा तसेच नखे, आणि ओठ गुलाबी न दिसत पांढरे दिसून येतात. त्याच सोबत डोळ्याचं खालचा भाग सुद्धा थोडा काळसर किंवा पांढरा दिसून येतो.

तसेच आपल्या भीती वाटल्यासारखे वाटते, काही वेळीस ह्रदयाचे ठोके कमी जास्त प्रमाणत होतात. छातीत धडधड झाल्यासारखे वाटणे; तसेच हिमोग्लोबिन कमी झल्यामुळे रक्त तयार करणाऱ्या लाल पेशी कमी प्रमाणत तयार होतात परिणामी रक्त कमी प्रमाणात तयार होते. तसेच काही वेळेस शरीरातील रक्त सुद्धा कमी होण्यास सुरुवात होते.

हिमोग्लोबिन प्रमाण कमी झल्यास घरच्या घरी काही घरगुती उपाय तुम्ही करू शकतात. तसेच आहारात काही फळांचा समावेश करावा ज्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन प्रमाण वाढण्यास मदत हतोय. प्रामुख्याने बीटरूट चे सेवन जेवणात अवश्य ठेवा त्याचा लाभ नक्की होतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.