How to maintain a relationship-wife and husband
लाईफस्टाईल

नाते कसे टिकवावे ज्या ठिकाणी नवरा किंवा पत्नी या दोघांपैकी एक खुपच संशयी असेल तर.

माझ्या बायकोशी कसे वागायचे हे काही जमजत नाही. प्रत्येक गोष्ट तिची ऐकली तिच्या मनासारखे वागले तरी सुद्धा भांडण हे होतात. किती प्रमाणे तिच्या सोबत वागलो ती काही ना काही प्रॉब्लेम तयार करते. सर्वात मोठा तिचा एक प्राब्लेम आहे तो म्हणजे संशय घेण्याच्या. घरून ऑफिसाला निगालो कि प्रत्येक दहा ते पंधरा मिनिटांनी कॅल करते. त्यात जर का फोन उचलण्यात उशीर झाला कि अनेक प्रश्न ती विचारते. त्यात हि दिलेल्या उत्तरावर ती कधीच समाधानी नसते.

घरात काही नवीन वस्तू खरेदी करण्यसाठी बाहेर जायचे ठरवले होते. विशेष म्हणजे माझ्या ऑफिस जवळ एक मॉल आहे त्या ठिकाणी जायचे होते. तिला म्हणालो तू माझ्या ऑफिस जवळ ये तिथून आपण दोघे जाऊ हे तिला सुद्धा आवडले. मी तिची वाट पहात ऑफिस बाहेर थाबलो तितक्यात माझ्या सोबत काम करणारी एक मैत्रीण तिथे अली तिला सुद्धा कोठे बाहेर जायचे होते तिथे ती पण कोणाची तरी वाट पहात होती.

तितक्यात माझी बायको तिथे अली. तिने मला कॉल केला मी तिच्या जवळ गेलो तिला बोलतो तिने वापस घरी निघून गेली. मीही तिच्या मागे घरी गेलो. थोड्याच वेळाने तिचे अनेक प्रश्न सुरु झाले. माझ्यापेक्षा ती खुप सुंदर आहे म्हणून तुला ती आवडत असेल. तुला माझ्या सोबत यायचे नव्हते म्हणून तू मला ऑफिस जवळ बोलवत होता. तुला दुसरी मुलगी आवडत असेल तर तिच्या सोबत का नाही लग्न केलेस. यापेक्षा सुद्धा अनेक वेगळे अनेक प्रश्न ती मला विचार होती.

नवरा बायको यांच्या मध्ये सर्वात अवघा गोष्ट मध्ये एकमेकात घेण्यात येणार संशय होय. ज्या नात्यात विश्वास कमी होतो त्या ठिकणी बऱ्याच समस्या निर्माण होतात. फक्त नवऱ्याला किंवा बायकोला त्रास होत असतो असे नाही. या नात्यात दोघांना सुद्धा सारख्याच प्रमाणात त्रास होत असतो. आणि याच त्रासात अनेक संघर्ष होतात आणि नेते तुटण्यापर्यंत जातात. अशा वेळी हे नाते कसे टिकवायचे असा प्रश्न निर्माण होतो.

अशा वेळी हे नाते कसे टिकवायचे असा प्रश्न निर्माण होतो. ज्या ठिकाणी संशय आहे त्या ठिकाणी सर्व गोष्टी अवघड होऊन बसतात.

स्त्रीला असे वाटत असते कि आपण कुठे तरी बायको म्हणून कमी पडतो कि काय,आपण इतरांसारखे सुंदर ,हुशार नाही आणि आपण आपल्या नवऱ्याला गमवणार तर नाही ना असे वाटते. पण हा विचार बायकोचा असतो कारण तिचा नवर्याकडे बघण्याचा उद्देश च असा बनतो . तिच्या मनातील ते संशयाच भूत असत त्यामुळे ती तसाच विचार करत असते. पण तीच तिच्या नवऱ्यावर तितकाच प्रेम असत पण संशयामुळे अशी परिस्थिती निर्माण होते. तिचा विश्वास हा तिच्या नवऱ्यावर खूप असतो पण तो संशय काढून टाकला पाहिजे .

तिच्या मनातील संशय हा नवर्यानी काढून टाकला पाहिजे ,त्या पद्धतीने तिच्याशी बोलला पाहिजे आणि तिच्या मनातील येणारी शंका दूर करण्यसाठी तील मदत केली पाहिजे. त्याच सोबत नवरा बायको यांच्यात सवांद ह सर्व गोष्टीवर सखोल झाला पाहिजे. म्हणजे दोघांच्या मनात कधीच संशय निर्माण होणार नाही.