अशा पद्धतीने करा श्री कृष्ण जन्माष्टमीची पूजा , How to worship Shri Krishna Janmashtami
धार्मिक

अशा पद्धतीने करा श्री कृष्ण जन्माष्टमीची पूजा.

श्री कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते. त्यामुळे आज आपण श्री कृष्ण जन्माष्टमीची पूजा कश्या पद्धतीने कार्याची त्या साठी कोणकोणते साहित्य लागणार आहेत. तसेच ती पूजा कधी आणि केव्हा करायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. येत्या काही दिवसावर श्री कृष्ण जन्माष्टमी अली आहे. त्यामुळे सर्व जण गोपाळकाळा म्हणजेच दही हंडीची सुद्धा प्रतीक्षा करत आहेत.

कृष्णाचा जन्म हा रात्री बारा वाजता झालेला आहे. त्यामळे पूजा सुद्धा त्याच वेळेस करायची आहे.  श्री कृष्ण जन्माष्टमीची पूजा करण्यसाठी जे साहित्य /किंवा पूजेसाठी लागणारे वस्तू हळद , कुंकू , अक्षदा , वस्त्रमाळ उदबत्ती , तुपाचे निरंजन , आणि नैवद्य म्हणून तुमि गोपाळकाला , लोणी, आणि पंचामृत या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत.

श्री कृष्ण जन्माष्टमीची पूजा

पूजा कशी मांडावी. एक चौरगन घ्या त्यावर स्वच्छ एक वस्त्र टाका , लाल, पिवळा , केशरी पैकी कोणताही रंगाचे घेतले तरी चालते. त्यानंतर एक आपला पाळणा (झुला) छोटासा लागणार आहे.  त्यात आपल्या बाळकुष्ण ठेवायचे आहे. छान पैकी फुलांनी हा चौरगन सजवू शकतात जर का तुमच्या कडे लाईटची माळ असेल तर ती सुद्धा तुम्ही लावू शकतात. त्याच सोबत छोट्या दिव्यांची सजावट सुद्धा केली तरी चालेल.

एका तांब्याच्या ताबनात (डिश) बाळकृष्ण घ्याचे आहे. कृष्णाचा जन्म हा रात्री बारा वाजता झाला होता त्यामुळे आपण त्याच वेळेस जन्माष्टमी साजरी करणार आहोत. त्याधी एक डिश मध्ये बाळकृष्ण ठेऊन संपूर्ण फुलांनी त्यांना झाकून ठेवायचे आहे. कारण जन्म हा रात्री उशिरा आहे.  रात्री बारा वाजले कि सर्व फुले काढून टाकायची आहेत म्हणजे त्याचा अर्थ असा आहे कि त्यांचा जन्म झला.

त्यानतंर कृष्णाला स्नान घालायचे आहे. आधी शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृत याने स्नान घातल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्यानी आघोळ घालायची आहे. त्यातंर स्वच्छ वस्त्राने पुसून घ्याचे आहे. त्यानतंर सुंदर वस्त्र आणि हार घालायचा आहे. आणि झोपाळ्यात बाळकुष्ण ठेऊन द्याचे आहेत. त्यानतंर हळद कुंकू वाहून .जर का तुमच्याकडे चंदन युक्त गधं असेलतर लावायचे आहे. फुले अर्पण करायची आहेत. अक्षदा व्हायची आहेत.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुळस आपल्याला अर्पण करायची आहे. तुळशीला एक वेगळेच महत्व असते या पूजे मध्ये, त्यामळे तुळस असणे गरजेचे आहे. त्यानंतर उदबत्ती लावून ठेवायची आहे. त्याच सोबत एक सुंदर बासरी बाळकृष्णा जवळ ठेवायची आहे. त्यानतंर तुपाचा दिवा लावून ओवाळून घायचे आहे. संपूर्ण पूजा झल्यावर पाळणा हलवायचा आहे.

सर्वात शेवटी नैदय दाखून आरती करायची आहे. नैवद्य म्हणून लोणी, गोपाळकाला , आणि पंचामृत ठेवायचे आहे. त्यांतर आरती कायची आहे. आरती झाल्यावर श्री कृष्णाचा जय जय कार करायचा आहे. बोला कृष्ण कन्हया लाल कि जय, कृष्ण कन्हया लाल कि जय. सर्वाना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्या.. 

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.