धार्मिक

आपल्या कुलदेवतेची पूजा कशी करावी?.कुलदेव आणि कुलदेवीच्या पूजनाचे फायदे…

मित्रांनो प्रत्येकांनी आपल्या-आपल्या कुलदेवतेची पूजा हि नेहमी केलीच पाहिजे.तसेच आपल्या कुलदेवतेचे रोज स्मरण केले पाहिजे आणि कुलदेवतेची पूजा हि केल्यास आपल्याला फायदे हे मिळतात. तसेच तुमच्या अडचणी,तुमची संकटे, दुःख हे दूर होण्यास मदत मिळते.

मित्रानो आपल्या कुलदेवतेची पूजा कशी करावी?,तसेच तुम्ही तुमच्या कुलदेवतेची पूजा केल्यास त्या पूजेचे कोणकोणते फायदे मिळतात. हे मी तुम्हाला खालीलप्रमाणे सांगणार आहे.

कुलदेवतेची पूजा कशी करावी

मित्रांनो कुलदेवता म्हणजे प्रत्येकाच्या कुळाची देवता होय.प्रत्येकानीच आपल्या कुलदेवतेची उपासना करावी.कुलदेवतेची उपासना केल्यास आध्यत्मिक शक्ती प्रसन्न होते. प्रत्येकाची कुलदेवताही वेगवेगळी असते. ज्याची कुलदेवता “स्त्री” असते तेव्हा “कुलदेवी ” असे म्हणले जाते आणि जेव्हा “पुरुष” हा कुलदेवता असतो तेव्हा “कुलदेव”असे म्हणतात.

मित्रांनो कुलदेवाची पूजा हि नेहमी करावी,कारण कुलदेवता हि आपले नेहमी रक्षण करत असते.आपल्या घरातील सगळं व्यवस्थित असावं आणि आपल्या घरातील सगळे नेहमी आनंदी आणि सुखी असावे असे वाटत असेल तर आपल्या कुलदेवतेची नेहमी आराधना,स्मरण कराव.

तसेच आपल्या घरातील मुलांचे शिक्षण,सतत आजारपण असणे ,अनेक प्रकारची संकटे येणे आणि मुलांची लग्न न होणे यासारख्या अडचणी जेव्हा निर्माण होतात,तेव्हा या मागे आपला कुलाचार नीट न झाल्यामुळे या अडचणी निर्माण होतात.तसेच आपण आपला कुलधर्म हा नीट पाळला नसेल तरी अश्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात.

मित्रांनो आपली कुलदेवता हि आपल्या घराचा मुख्य भाग असतो, कुलदेवता हि आपल्या घराची आई असते. त्यामुळे कुलदेवतेची उपासना हि करावी आणि उपासना करताना कोणत्या गोष्टी पाळाव्या ते मी सांगणार आहे.

पहिलं म्हणजे आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक यापैकी एक तर आपल्या घरात नक्की असावं.तसेच जर पूर्वीपासून असलेले टाक असतील तर खूप छान ,पण जर टाक नसतील तर एक फोटो तर नक्की असावा आणि त्या फोटोची पूजा हि रोज करावी.

मित्रानो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा मंत्र जप हा दररोज केला पाहिजे.तो जप हा एक माळ तरी केला पाहिजे.तसेच मित्रानो ज्यांना आपली कुलदेवता कोणती आहे हे जर तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही “श्री कुलदैवताय नमः “असा जप हा नियमित करावा.

तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा जो वार आहे त्या दिवशी उपवास हा नक्की करावा.यामुळे खूप फायदा होतो. तसेच तुम्हाला जर तुमच्या कुलदेवतेचा वार कोणता आहे हे माहित नसेल तर तुम्ही मंगळवार करावा,कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे मंगळवार हा देवीचा वार आहे.

मित्रानो शेवटची गोष्ट हि आहे कि वर्षातून एकदा तरी घरातील सगळ्यांनी मिळून आपल्या कुलदेवतेला नक्की जावे आणि कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि महिलांनी देवीची ओटी हि नक्की भरावी.तुम्ही वरती सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पाळल्या तर तुमच्या कुलदेवता हि प्रसन्न होते.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.धन्यवाद. “श्री कुलदैवताय नमः ”