धार्मिक

नोकरीमध्ये सततच अपयश येत असेल तर गुरूंचे अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून बघा…

मित्रांनो सगळ्यांना असे वाटत असते कि आपल्याला चांगली नोकरी असावी. आपल्याला चांगली नोकरी असल्यास आपल्या घरातील परिस्थिती चांगली होईल.तुम्हाला नोकरी लागल्यास तुमचा कॉम्फिडेन्ट वाढेल आणि तुम्हाला जर नोकरीत अपयश येत असेल तर तुमचा कॉम्फिडेन्ट कमी होतो.

मित्रांनो प्रत्येकालाच असे वाटत असते कि आपल्याला नोकरी चांगली असावी आणि ती स्थिर असावी .कारण आपल्या नोकरी मुळे आपली प्रगती आधीक चांगली होत असते.त्यामुळे मी आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमचे नोकरीत येणारे अपयश दूर होण्यास मदत होईल आणि तुम्हाला नोकरीत चांगले यश मिळेल .

मित्रानो जर तुमच्या पत्रिकेत ग्रहांचे स्थान हे योग्य जागी नसेल तरी पण आपल्या नोकरी वर त्याचा परिणाम होतो. काही वेळा आपल्याला नोकरी लागते पण ती टिकत नाही खूप अडचणी येतात. आपल्याला नोकरीत अपयश होतात.तसेच काही वेळा नोकरीत आपल्याला वरिष्ठ खूप त्रास देत असतात.असे काही वेळा जर कोणी आपल्यावर जळत असेल किंवा आपल्याला त्रास देत असतात.

मित्रानो आपण कोणत्या देवाचा जप करतो ,कोणते स्तोत्र वाचतो किंवा आपण कोणत्या देवाची आराधना करतो हे कधी कोणाला कधी सांगू नयेत ,असे केल्यास आपल्या इच्छा कधी पूर्ण होत नाही असं म्हणाल जात त्यामुळे आपण हे कधी कोणाला सांगू नये.

मित्रानो मी आता तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहे तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ करून एक तांब्याचा तांब्या घेयचा आहे आणि त्यात पाणी भरून घेयच आहे आणि त्यात एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्घ्य देयचा आहे.हा उपाय तुम्ही जर तुमच्या कुंडलीत जर शनी जर केन्द्र स्थानी असेल तर तुम्ही हा उपाय करू नये.

तुम्ही “सुंदरकांड ” हा ग्रंथ तुम्ही वाचावा हा दुसरा उपाय अगदी सोपा आहे . हा उपाय केल्यास तुम्हाला नोकरी मिळेल आणि तुमची प्रगती होण्यास मदत होईल. त्यामुळे हा सोपा उपाय तुम्ही नक्की करून बघा.

मित्रानो तुम्हाला मी आता तिसरा उपाय सांगणार आहे .तुम्ही मंगळवारी हनुमान चालीसा वाचा हा उपाय नक्की करा आणि मारुतीला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा असं केल्यास तुम्ही यशश्वी होण्यास कोणी अडवू शकता नाही. त्यामुळे हे अगदी सोपे उपाय तुम्ही करू शकता हे उपाय केल्यामुळे नोकरीची अडचण दूर होण्यास मदत होईल आणि नोकरी लागण्यास मदत होईल. तसेच तुमच्या नोकरीत तुम्हाला यश येण्यास मदत होईल.श्री स्वामी समर्थ !