धार्मिक

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करता येत नसेल तर हि वस्तू करा खरेदी,भरभराट होईल.

अक्षय्य तृतीय हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जात. बरेचजण या दिवशी सोनं खरेदी करतात.तुम्हाला जर या दिवशी सोनं खरेदी करणं जमत नसेल तर तुम्ही ह्या काही वस्तू खरेदी करू शकता.

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला “अक्षय्य तृतीया “असे म्हणतात. अक्षय्य तृतीया हा मुहूर्त खूप शुभ मानला जातो.अक्षय्य तृतीय हा लक्ष्मी चा दिवस मानला जातो. या दिवशी सोनं खरेदी करणं खूप शुभ मानले जाते.या शुभ दिवशी नवीन कामांना देखील सुरुवात केली जाते.या दिवशी दान करणे देखील शुभ मानले जाते.

मित्रांनो या वर्षी अक्षय्य तृतीया हि २२ एप्रिल,शनिवारी या दिवशी आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हा सकाळी ७.४९ वाजता सुरु होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४७ वाजता समाप्त होणार आहे.या शुभ दिवशी सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जाते. या दिवशी सोनं खरेदी केल्याने घरात लक्ष्मी प्रसन्न होते असं मानलं जात. तसेच घरात सुख-समृद्धी देखील वाढते असे मानले जाते.

मित्रानो तुम्हाला जर सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही या वस्तू तुमच्या घरी आणा.

मित्रांनो अक्षय्य तृतीयेला काही कारणामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही कवड्या खरेदी करून घरी आणू शकता.पहिली वस्तू म्हणजे कवड्या ह्या लक्ष्मीला खूप प्रिय असतात. त्यामुळे कवड्या खरेदी करू शकता.तसेच कवड्या खरेदी करताना त्या ११ खरेदी करा आणि त्याची पूजा करावी.लक्ष्मी ची कृपा तुमच्या वर सदैव राहील.

दुसरी वस्तू म्हणजे “एकाक्षी नारळ” आहे. हा नारळ लक्ष्मीचेच रूप मानले जाते.घरात एकाक्षी नारळ असणे म्हणजे घरात लक्ष्मी प्रसन्न असते असे मानले जाते.त्यामुळे अक्षय्य तृतीयेला एकाक्षी नारळ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.त्यामुळे या अक्षय्य तृतीयेला एकाक्षी नारळ खरेदी केल्यास तुमच्या घरातील सगळ्याशी समस्या ह्या कमी होतील आणि लक्ष्मी तुमच्या वर प्रसन्न राहील.

तिसरी वस्तू म्हणजे “शंख”आहे.शंख घरात असणे खूप शुभ मानले जाते.शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जाते.त्यामुळे शंखाची पूजा केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. शंख हा घरात असल्यास लक्ष्मीचा वास घरात असतो असे मानले जाते.त्यामुळे या अक्षय्य तृतीयेला “दक्षिणावर्ती शंख “हा घर घेऊन या म्हणजे लक्ष्मी तुमच्या वर प्रसन्न होईल.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.