कंबर-गुडघे खूप दुखतात, कॅल्शियमची कमी आहे तर हे ५ पदार्थ खा...
आरोग्य

कंबर-गुढघे खूप दुखतात ,कॅल्शियमची कमी आहे तर हे ५ पदार्थ खा…

मित्रांनो आपल्याला शरीराच्या विकासासाठी कॅल्शियमची आवशक्यता जास्त असते.शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर लवकर थकवा येतो,गळून गेल्यासारखे वाटते, थकवा जाणवतो.त्याचप्रमाणे गुडघे दुखणे,कंबर दुखणे,हाडांचे दुखणे हे सुद्धा कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणे आहेत. शरीरातील कॅल्शियम भरून काढण्यासाठी तुम्ही दूधजन्य पदार्थांचे सेवन करू शकता.तसेच लहान मुलांनापण कॅल्शियमची कमतरता हि अधिक असते.

आपल्याला लागणाऱ्या रोजच्या कॅल्शियम हे किती असावे हे आहारतज्ञानी सांगितलेले आहे. लहान मुलांना म्हणजेच ० ते ६ महिन्यापर्यंच्या लहान बाळांना २०० मिलिग्रॅम एवढे कॅल्शियम आवश्यक असते.तर ७ ते १२ महिन्यापर्यन्तच्या बाळांना २६० मिलिग्रॅम एवढे कॅल्शियमची गरज असते.

१ ते ३ वर्ष्याच्या मुलांना ७०० मिलिग्रॅम कॅल्शियमची आवश्यक्यता असते.त्याचप्रमाणे ४ ते ८ वर्षाच्या मुलांना १००० मिलिग्रॅम कॅल्शियम आवश्यक असते . ९ ते १२ वर्षाच्या मुलांना १२०० मिलिग्रॅम आणि १९ ते ५० वर्षाच्या लोकांना १००० मिलिग्रॅम कॅल्शियम लागते. त्याचप्रमाणे ५१ ते ७० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना १२०० ग्राम एवढे कॅल्शियम आवश्यक असते.

शरीरात जर कॅल्शियमची कमी असेल तर त्यांनी हे पाच पढार्थचे सेवन केले पाहिजे ,म्हणजे त्यांचे कॅल्शियम भरण्यास मदत होईल . ते कोणकोणते पदार्थ आहेत ते आपण खालीलप्रमाणे पाहुयात.

१)दूधजन्य पदार्थ :-

दूधजन्य पदार्थ म्हणजेच दूध,दही,पनीर हे पदार्थ कॅल्शियमयुक्त आहेत. यामध्ये कॅल्शियमची मात्र हि जास्त असते. कॅल्शियमची कमी दूर कार्यासाठी तुम्ही हे पदार्थ नियमित खाल्ले पाहिजेत. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता हि लवकर भरून निघेल आणि तुम्हाला कॅल्शियमची कमतरता भासणार नाही.

२)सोयाबीन :-

सोयाबीनमध्ये कॅल्शियमची मात्र हि अधिक असते.त्याचबरोबर आयर्न,प्रोटीन चे प्रमाण देखील अधिक असते.सोयाबीन हे मुलांना खूप आवडते.मुलांना नाश्त्यामध्ये सोयाबीन हे दिले गेले पाहिजे.याचप्रमाणे डायबिटिसच्या लोकांसाठी सोयाबीन खूप फायदेशीर ठरते.कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी सोयाबीनचे आहारात रोज सेवन केले पाहिजे.

३)पालक :-

पालकात मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात.पालकाची भाजी हि खाल्यामुळे आपल्या शरीरातील शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सेवन केलेले चांगले असते.पालक हा खाल्यामुळे शरीर हे मजबूत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पालक हा आपल्या शरीरातील विषारी घटक हे बाहेर टाकण्यास मदत करते.पालकात कॅल्शियम,आयर्न,फॉस्फरस यासारखे पोषक घटक असतात.

४)ब्रोकोली :-

ब्रोकोली हि आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असते.ब्रोकोलीमध्ये कोलोजन असते आणि ते आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि हाडांना मजबूत करण्याचे काम करते.त्यामुळे ब्रोकोली केल्याने आपले आरोग्य हे चांगले राहण्यास मदत होते.आपल्या आहारात ब्रोकोली हि रोज खाणे गरजेची असते.ब्रोकोली खाल्यानी आपण गंभीर आजारापासून वाचू शकतो.

५)ड्रायफ्रूट्स :-

शरीरातील कॅल्शियमची कमी दूर करण्यासाठी आपण रोज भिजवलेले ड्राय फ्रुटस खाल्ले पाहिजेत.बदाम,काळे मनुके,अंजीर,आक्रोड हे नियमित खाणे गरजेचे असते. या ड्रायफ्रुटस मध्ये व्हिट्यामिन ई ,कॅल्शियम,कॉपर ,मॅग्नेशियम अश्या अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात.ड्रायफ्रुटस हे दररोज झाले पाहिजेत जर तुम्ही ते रात्री भिजवुन सकाळी उठल्यावर खाल्यास त्याचा अधिक फायदा होतो.