धार्मिक

श्री गणपतीचे विसर्जन घरीच करणार असाल तर या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.

सर्वानी आपल्या घरी श्री गणपती बाप्पाला थाटामाटात घरी आणले होते. श्री गणपती बाप्पाचे आगमन सर्वानी जोरात केले. बऱ्याच घरी रोज वेगवेगळे नौवेद्य तयार केले जात होते. 31 ऑगस्टपासून सुरू झालेला गणेश उत्सव सर्वांचा आनंदात गेला आहे. उद्या अनंत चतुर्दशीला 09 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार आहे. गेले दहा दिवस श्री गणपतीची आराधना करत असताना हे दिवस कसे गेले ते कुणालाच कळाले नाही.

उद्या आपल्या लाडक्या श्री गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. म्हणजेच अनंत चतुर्दशीला श्री गणपती बाप्पाचे विसर्जन सर्वजण थाटामाटा करताना दिसून येतील. तर काही भक्तांनी दीड दिवसात, पाच दिवसात तर काही नि सात दिवसात विसर्जन केले आहे. उद्या सर्वांच्या घरातील श्री गणपती बाप्पाचे विसर्जन केले जातील. आणि पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत विसर्जन होत राहील.

श्री गणपतीच बाप्पाचे विसर्जन करताना ढोल ताशे यासारखी वाद्य वाजून आनंदाने श्री गणपतीची मिरवणूक काढून त्यांना निरोप दिला जातो. श्री गणपतीचे विसर्जन हे नदी, तलाव, विहीर यामध्ये केले जाते. पण बऱ्याच ठिकणी पर्यावरण खराब होऊनये म्हणून लोकांना घरच्या घरीच विसर्जन करावे असे सांगितले जाते. असा वेळी घरच्या घरी विसर्जन करताना कोणते नियम आपण पाळावे याबद्दल माहिती जाणून घेऊ.

श्री गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला करण्यात येते. या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घरातील देव पूजा करून घ्यावी. त्यानंतर श्री गणपतीची पूजा करावी, सर्वाना आरती साठी बोलवावे श्रीगणपतीला फुलांचा हार घालावा. त्यानतंर फुले अर्पण करावीत, अगरबत्ती लावावी, गोड म्हणून मोदकाचा नैवद्य करावा. आरती झल्यावर श्री गणपतीचे विसर्जन करावे.

घरच्या घरी श्री गणपतीचे विसर्जन करताना एक मोठे भांडे घ्यावे त्यात स्वच्छ पाणी घ्यावे. थोडे गंगा जल टाकवे. त्यानतंर थोडे कुंकू आणि अक्षदा टाकून त्या पाण्याची पूजा करावी. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असुद्या गणपती पाण्यात पूर्ण बुडेल इतके पाणी आपल्याला घायचे आहे. ज्या वेळी आपण श्री गणपती विसर्जन घरच्या घरी करत असताना थोडा सुद्धा पाण्याच्या बाहेर गणपतीची मूर्ती रहाणार नाही याची काळजी घ्या.

घरच्या घरी विसर्जन करताना दहा दिवस जे काही निर्माल्य तयार झाले असेल ते सर्व एका पिशवीत भरून ते आपल्या जवळच्या नदी, तलाव, किंवा विहरीत सोडू शकतात. किंवा ज्या ठिकाणी निर्माल्य संकलित केले जाते त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही देऊ शकतात. जर का या पैकी काहीच जमत नसेल तर त्याचे खत म्हणून तुम्ही घरातील झाडांना टाकू शतकात. फक्त आपले पाय त्याला लागणार नाही याची काळजी घ्या.

त्यानतंर श्री गणपतीचा जयजयकार करत श्री गणपतीची मूर्ती उचलून घ्या. त्यानतंर ज्या भांड्यात तुम्ही विसर्जन करणार आहात त्यात हळू हळू सोडून द्या. त्यानतंर ज्या पाण्यात विसर्जन केले आहे असे पाणी इतरत्र फेकून देवू नका. एक पवित्र झाडाखाली हे पाणी तुम्ही सोडून देवू शकतात. जसे कि, पिपळच्या, वडाच्या, किंवा उंबराच्या झाडाच्या बुडालं हे पाणी विसर्जित करा (सोडून द्या). इतके सुद्धा शक्य नसेल तर आपल्या घरातील झाडांना दिले तरी चालते. फक्त एक गोष्ट आवर्जून लक्षात असून या पाण्यावर आपला पाय पडणार नाही याची काळजी घ्या. गपणती बाप्पा मोरया, गपणती बाप्पा मोरया, गपणती बाप्पा मोरया …. पुढच्या वर्षी लवकर या…

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.