नाचणी
घरगुती उपाय

शरीरात कॅल्शियम ची कमतरता जाणवत असेल तर या गोष्टी करा…

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण आजच्या लेखामध्ये आरोग्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवत असल्यास ,तसेच शरीरातल्या सर्व आजारापासून दूर ठेण्यासाठी नाचणी हे एक महत्वपूर्ण धान्य आहे . चला तर आपण नाचणी बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

नाचणीमध्ये जीवनसत्व, पोटॅशियम, फायबर, कर्बोदक आणि कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतात . नाचणी हि सर्व रोगांना मुळापासून संपवण्यास मदत करते. पोटाचे आजार, लठ्ठपणा , ताणतणाव, मधुमेह आणि सांधेदुखी बारा करण्यासाठी नाचणी खूप पूर्वी वापरली जाते. नाचणी हि डोळ्यांसाठी हि गुणकारी आहे.

जशी आपण ज्वारीची भाकरी करतो तशीच नाचणीची भाकरी करून खाऊ शकतो, तसेच आपण नाचणी दुधासोबत घेतल्यानंतर जास्त गुणकारी आहे. नाचणी हि थंड असल्यामुळे उन्हाळ्यात नाचणीचे सेवन बऱ्याच प्रमाणात केले जाते.

अशक्तपणा कमी करणे –
नाचणीमध्ये जीवनसत्वे अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला लागणारे पोषक घटक हे नाचणीतुन जास्त प्रमाणात मिळतात. म्हणूनच रोज एक चमचा नाचणी दुधात टाकून घेतल्याने शरीरात आलेला अशक्तपणा भरून काढण्यास मदत होते. तसेच रोज नाचणीचे सेवन केल्यास रक्त शुद्धीसाठी फायदा होतो.

नाचणी मधुमेहावरती गुणकारी –
मधुमेह हा मोठा आजार आहे. या आजारावरती नाचणी उपयुक्त आहे. मधुमेहावरील उपचारासाठी नाचणीची मदत घेतली जाते. नाचणीची रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. म्हणून ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यां लोकांनी त्यांच्या आहारात नाचणी हि अवश्य घेतली पाहिजे.

हाडे मजबूत होण्यास मदत –
नाचणी हि कॅल्शियमयुक्त आहे त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. सांधेदुखीची समस्या असलेल्या लोकांनी नाचणीचे सेवन केले पाहिजे. जेणेकरून हाडांना लागणारी कॅल्शियमची कमतरता दुर होईल.

पोटाचे आजार –
नाचणी हि पचायला अगदी हलकी असते. त्यामुळे पचनप्रक्रिया सुलभ होते त्यामुळे पॉट साफ होण्यास मदत होते. नाचणी हि पचायला हलकी असल्यामुळे चरबी जमा होत नाही त्यामुळे शरीर चांगले राहते तसेच लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते .तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.