In Navratri, the woman who is in the temple of her house
धार्मिक

नवरात्रीमध्ये जी स्त्री आपल्या घरातील देवघरात कापूर वापरून हे काम केले तर तिची सर्व इच्छा पूर्ण होतात.

सर्वत नवरात्र उत्सव सुरू आहे. माता जगदंब यांच्या नऊ रूपाचे रोज पूजन करतो. माता जगदंब देवीच्या शक्ती समोर सर्व भक्त शरण जातात. नवरात्रीमधील नऊ दिवस नऊ रात्र शुभ, मंगल आणि कल्याणकारी मानले गेले आहे. या दिवसात जे भक्त मनापसून देवांची उपासना करतात, जप करतात, घरात होमहवन करतात त्याना माता देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

याच दिवसात जर का आपण विविध उपाय केले तर त्याचा लाभ आपल्याला नक्की प्राप्त होतो. त्या साठीच आपण एक आवर्जून केला पाहिजे असा उपाय आपण आज पहाणार आहोत. होय कापराचा उपाय जो या दिवसात स्रियांनी नक्की केला पाहिजे असा हा उपाय आहे. पण हा उपाय करण्याचे काही नियम आहेत. तसेच हा उपाय सर्वानी करायचा नाही.

आज आपण कापराचा उपाय पहाणार आहोत तो फक्त स्त्रियांनी करायचा आहे. ज्या घरात अशांती आहे; ज्या घरात सतत भांडणे होतात; घराची प्रगती होत नाही; तसेच मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही. तसेच घरात गृह दोष आहे अशी तुमच्या मनात शन्का आहे. व्यवसाय मध्ये प्रगती होत नाही. घरात सतत प्रत्येकाच्या हातात अपयश येत आहे. या सर्व समस्यांवर तुम्ही या दिवसात कापराचा उपाय करू शकतात.

ज्या घरात सतत भांडणे होतात अशा घरात चार कोपऱ्यात प्रत्येकी चार कापऱ्याच्या वड्या ठेवाव्यात यामुळे घरात शांती प्रस्थपित होते. कारण नवरात्री मध्ये नऊ दिवस सर्वात चांगले दिवस असतात. त्यामुळे त्याचा लाभ नक्की होतो. तसेच ज्या घरातील व्यवसाय किंवा दुकान चालत नसेल अशा लोकांनी आपल्या दुकानात कच्चेच्या भांड्यात सात कापऱ्याच्या वड्या, एक छोटा तुरटीचा खडा आणि मोठे मिठाच्या वड्या या सर्व वस्तू दुकानात किंवा ज्या ठिकाणी व्यवसाय आहे त्या ठिकाणी कोणत्याही दिशेला ठेवायचे आहेत. काही दिवसात तुम्हला त्याचा लाभ होताना दिसून येईल.

आपल्या घरात सतत काही ना काही दोष आहे असे वाटत असेल. तसेच घरात जास्त प्रमाणात नकारात्मक गोष्टीतच प्रभाव आहे असेल वाटत असेल तर आपल्या बाथरूम मध्ये आणि टॉयलेट मध्ये काही कपूरच्या वड्या ठेवाव्यात तसेच शेणापासून तयार झालेली गौरी त्यावर पाच कापऱ्याच्या वड्या, थोडा गूळ आणि गाईचे तूप एकत्र करून जाळायच्या आहेत. आणि त्याची जी काही राख उरेल ती घराच्या लाभ कोणत्याही झाडाच्या बुडाशी टाकून द्यावी.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.