वास्तुशास्त्रा

धर्मशास्त्रातील झोपेसंबंधी २१ नियम आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

धर्मशास्त्रातील झोपेसंबंधी २१ नियम आजच्या लेखात जाणून घेणार आहोत
नियम १: ओले पाय करून झोपू नये. कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो.
नियम २:पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते शिक्षणात प्रगती होते
नियम ३:पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होते.
नियम ४:उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो, सतत मृत्युभय असते.
नियम ५:दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य वाढते.
नियम ६:देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये.
नियम ७:झोपलेल्या व्यक्तीस अचानक उठवू नये.
नियम ८:विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ जर झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे(चाणक्य नीती)
नियम ९:नग्न अवस्थेत झोपू नये. (धर्मसूत्र)
नियम १०:निरोगी शरीर हवे असेल तर ब्र्हममुहूर्त म्हणजे पहाटे ३:४० ते ४:२८ च्या दरम्यान उठले पाहिजे (देवी भागवत)
नियम ११:पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये. (पदमपुराण)
नियम १२:सुनसान ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये.
नियम १३:तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये. (महाभारत)
नियम १४:दिवसा कधीही झोपू नये. परंतु ज्येष्ठ महिन्यात १ तास ४८ मिनटे झोपू शकता. (दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते.)
नियम १५:सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असाह्य होतो. (ब्राह्मवैवर्त पुराण)
नियम १६:सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपले पाहिजे.
नियम १७:डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
नियम १८:यम आणि दृष्ट देवतांचे निवास्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि त्यामुळे मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते. शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते.
नियम १९:हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये
नियम २०:पलंगावर बसून खाणे तसेच पिणे अयोग्य तसेच अशुभ मानले जाते.
नियम २१:झोपताना वाचन करू नये आणि असे केल्याने नजरदोष निर्माण होतो. या सर्व नियमांचे अनुसरण केल्याने कीर्ती वाढते व निरोगी व दीर्घायुष्य लाभते. श्री स्वामी समर्थ !

मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद