आरोग्य

फळं आणि जेवण कोणत्या भांड्यात ठेवायचं, यासाठीचे आयुर्वेदाचे नियम तुम्हाला माहिती आहेत का??

मित्रानो आपण सगळे बऱ्याच वेळा आपण जेवण करू शिल्लक राहिलेलं जेवण आपण ते डब्यामध्ये घालून फ्रिज मध्ये ठेवतो आणि ते दुसऱ्या दिवशी गरम करून खातात.प्रत्येकाला हा सोपा मार्ग वाटतो. पण असे केल्यास आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण अन्न साठवताना काळजी घेणं गरजेचं असत.

पूर्वीच्या काळातली माणसं जेवण बनवताना वेगवेगळ्या भांड्याचा वापर करत होते. त्यामध्ये लोखंडा ची भांडी, मातीची भांडी, चांदी ची भांडी आणि सोन्याची भांडी वापरात होते. अशी भांडी वापरण्यामागे एक प्रकारचं शास्त्रच होत. आजकाल या गोष्टीचा सगळ्यांना विसर पडला आहे त्यामुळे आजारपणं वाढलेली दिसत आहेत. अन्न साठवण्याचे बरेच असे पदार्थ आहेत ते म्हणजे शिजवलेले अन्न साठवणे, फूड पॅकेट , इन्स्टंट फूड पॅकेट अश्या प्रकारे अन्न साठवले जाते.

मित्रानो आता मी तुम्हाला अन्न हे कश्या प्रकारे साठवायचं आहे ते सांगणार आहे . तसेच आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे अन्न हे कसे साठवायचे आणि ते अन्न साठवताना कोणत्या चुका करायच्या नाहीत ते सांगणार आहे. आता आपण च आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे. आता आपण अन्न कस साठवायचं ते जाणून घेऊयात .

पदार्थ आणि अन्न हे कोणत्या भांड्यात ठेवायचं आणि त्याचे फायदे
आपल्या भारतात सगळेजण अन्न हे कोणत्याही भांड्यात ठेवतात. पण अन्न साठवण्याची भांडी हि वेगवेगळी असते. कोणत्याही भांड्यात कोणतेही अन्न ठेऊ नये असे म्हणतात. असे केल्यास आपले आरोग्य हि बिगडू शकते.

१)लिंबाचा रस कोणत्या भांड्यात ठेवायचे :-मित्रानो तुम्ही लिंबाचा रस आणि सरबत हे कोणत्याही भांड्यात ठेवत असाल तर असं करू नका. असे मानले जाते कि लिंबाचा रस, सरबत तसेच फळाचा रस हे चांदीच्या भांड्यात ठेवणे चांगले असते. चांदीच्या भांड्यात लिंबाचा रस , सरबत हे ठेवणे चांगले असते त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होत नाही असे म्हणतात.

२)तूप हे कोणत्या भांड्यात ठेवावे:-भारतीयांच्या जेवणात सगळ्यात जास्त तूप हे वापरले जाते. तुपाशिवाय काही पदार्थ हे खावेत वाटत नाहीत. तूप हे लोखंडी भांड्यात ठेवलेले चांगले असते. तुपासाठी प्लॅस्टिकची बरणी वापरणे चांगले नसते.

३)आंबट पदार्थ कोणत्या भांड्यात ठेवावेत :-मित्रानो आंबट पदार्थ कोणत्या भांडयात ठेवावेत . कारण आंबट पदार्थीची रिएक्शन हि येण्यात भीती असते. म्हणूनच आंबट पदार्थ हे दगडाच्या भांड्यात साठवावेत. दगडाच्या भांड्यात ठेवल्यामुळे रिएक्शनची भीती हि कमी असते, आणि त्यात पदार्थ ताजे राहते.

४)शिजवलेले अन्न हे चांदीच्या भांड्यात ठेवणे चांगले असते.

५)लिंबासारखे आंबट पदार्थ हे कधीच लोकांडाच्या भांड्यात ठेऊ नका.

६)पाणी हे नेहमी तांब्याच्या , मातीच्या आणि चांदीच्या भांड्यात पाणी हे साठवावे.

७) फळं हे नेहमी ताज्या पानातच ठेवावे असे आयर्वेदात म्हणतात.