धार्मिक

10 सप्टेंबर ,भाद्रपद पौर्णिमेला तुमच्या कपाटात गुपचूप ठेवा हि वस्तू पैसा कधीच कमी पडणार नाही…

मित्रानो ,सध्या भाद्रपद महिना चालू झालेला आहे आणि १० सप्टेंबर या दिवशी हि भाद्रपद पौर्णिमा आली आहे. भाद्रपद पौर्णिमा हि खूप शुभ मानली जाते. भाद्रपद पौर्णिमा म्हणजे आपण माता लक्ष्मी देवी ची आवडती तिथी मानली जाते. या दिवशी आपण माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करू शकतो आणि माता लक्ष्मी देवी आपल्या घरी येऊ शकती.भाद्रपद पौर्णिमेला आपण लक्ष्मी देवीची आपण पूजा केली पाहिजे. या भाद्रपद पौर्णिमा पासून श्राद्ध-पक्ष सुरु होतात.,यालाच आपण पितृ पंधरवडा असं म्हणतो.

मित्रानो भाद्रपद पौर्णिमेला आपण लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा करू शकता ,तुम्ही हि पूजा संध्याकाळी सूर्यास्तानंतर करू शकता. लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी संध्याकाळची वेळ हि चांगली मानली जाते. या वेळी लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होऊ शकते आणि आपल्या घरात सुख समृद्धी, पैसे ,समाधान येऊ शकते. लक्ष्मी देवी हि चंचल आहे आणि तिला आपण थांबून ठेवले पाहिजे त्यासाठी उपाय केले पाहिजेत.

आपण भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी आपण घर स्वच्छ केलं पाहिजे. तुम्ही सकाळी स्वच्छ आंघोळ करून ,घराला तोरण बांधून, घराचा मुख दरवाजा स्वच्छ करून त्या मुखदरवाजावर स्वस्तिक किंवा ओम काढावे ,दारासमोर छान रांगोळी काढावी , घरात वादविवाद करू नये, घर शांत ठेवावे असे केल्यास आपल्या घरात पैसे कमी पडणार नाही आणि सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते.

मित्रानो, या पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवी सगळ्यांच्या घरी येऊन जातात, म्हणून आपलं घरात शांतता ठेवावी ,या दिवशी तुम्ही पिंपळाची पूजा करु शकता , तुम्ही पिंपळाची पूजा केल्यास तुमच्या घरातील सततच आजार पण दूर होण्यास मदत होईल, कर्ज असेल ते सुद्धा दूर होण्यास मदत होईल. पिपळाची पूजा कशी करायची ते बघू -धुप ,दिवा लावून पूजा करावी , फूल अर्पण करा आणि एक तांब्याभर पाणी पिंपळाला अर्पण करा,आपल्या अडचणी ज्या असतील त्या ह्या पिंपळाला सांगावी, या पिंपळाच्या झाडात माता लक्ष्मी देवीचा वास असतो.

पौर्णिमेच्या दिवशी गरीब लोकांना तुम्ही दान धर्म करा. तुम्हाला जस हवं आहे तस दान करा. गरिबांचे आशीर्वाद पण महत्वाचे असतात.तसेच चंद्राला अर्ध्य पण अर्पण केले जाते ज्या लोकांना हाडाची विकार आहेत , डोळ्यांच्या समस्या ,तसेच नवरा बायको मध्ये भाडंण होत असतील तर त्यासाठी चंद्राला अर्ध्य केले पाहिजे. चंद्राला अर्ध्य कसे करावे ते बघु , तांब्याभरून पाणी आणि त्या पाण्यात कच्च दूध , तांदूळ ,साखर टाकून घायच आहे आणि “ओम श्राम श्रीम श्रोम चांद्रमास नमः “हा जप करणं चंद्राला अर्ध्य द्याच आहे.तुमच्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि नवरा बायको मध्ये प्रेम वाढण्यास मदत होते.

मित्रानो तुम्ही तुमच्या घरी श्री यंत्र आणून त्या यंत्राची पूजा करायांची आहे असे केल्यास माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होण्यास मदत होते.लक्ष्मी हि चंचल आहे ति स्थिर होण्यास मदत होते. याच पौर्णिमेच्या दिवशी आपण लहान पाच मुलींना घरी बोलवून त्याची पूजा करायची आहे. लक्ष्मी देवीची पूजा करू खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ती खीर त्या मुलींना पण खायला देयची आहे तसेच त्यांना दक्षणा देऊन त्यांची पूजा करायची आहे. असे केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते.

भाद्रपद पौर्णिमेचा लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठीचा महत्वाचा उपाय बघुयात, एक पाट ठेऊन त्यावर पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेऊन त्यावर लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा आणि तुमच्या कडे जर ११ कवड्या असतील तर त्या पण त्या पाटावर ठेवा आणि गंध आणि लाल फूल वाहावे, लक्षुमी ची पूजा करून लक्षुमी स्तोत्र किंवा कंकधारा स्तोत्र म्हणावे किंवा १०८ वेळा हा मंत्र करावा ,”ओम श्रीम नमः “या बीज मंत्र करावा किंवा “ओम श्रीम श्रयेन नमः “हा जप करावा. असे केल्यास लक्ष्मी कायम तुमच्या घरी वास्तव्य करते.अख्या पद्धतींनी हि पूजा पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी हि पूजा काढताना या ११ कवड्या एका लाल वस्त्रात बांधून आपल्या कपाटात ठेवावे तुम्हाला पैसा कधीच कमी पडणार नाही आणि त्या ११ कवड्या परत पुढच्या वर्षी आपण भाद्रपद पौर्णिमेला काढून त्याची पूजा करू शकता.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.