किडे हे तांदळामध्ये होणार नाही, यासाठी घरगुती उपाय.
किचन टिप्स

पोरकिडे आणि आळ्या हे तांदळामध्ये होणार नाही, यासाठी घरगुती उपाय.

भारताच्या विविध भागात भात लागवड केली जाते. तसेच भात हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक आहे. त्यामुळे देशात विविध भागातील लोक हे वर्षभर पुरेल इतके धान्य साठवून आपल्या घरात ठेवतात. आणि आपल्याला लागेल तास त्याचा वापर करत राहतात. पण देशात वातावरण हे सतत बदलत असते त्यामुळे तांदळामध्ये पोरकिडे, आळ्या आणि बारीक किडे होतात.

बऱ्याच ठिकाणी कडक ऊन पडल्यावर तांदूळ आणि डाळी ऊना मध्ये ठेवल्या जातात. कारण कडक उन्हात ठेवल्याने त्यातील किडे आणि आळ्या मरून जाव्यात म्हणून. पण हा उपाय केल्याने त्याचा लाभ होईल असे नाही. वातावरण बदले कि पुन्हा किडे किंवा आळ्या होऊ शकतात. किंवा बाजारात बऱ्याच प्रमाणत केमिकल युक्त पवडर किंवा पेष्ट मिळते त्याने फरक जरी पडत असला ती त्यामुळे तांदूळ खराब होण्याची शक्यता असू शतके तसेच हे केमिकल आपल्या शरीरात जाऊन शकतात. त्यामुळे आपल्याला इतर आजार होऊ शकतात.

हे पण वाचा:- दररोज खजूर खाण्याचे गुणकारी फायदे.

त्यामुळे आज आपण पोरकिडे, आळ्या आणि किडे तांदळामध्ये होणार नाही यासाठी आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय तांदळासाठी आहे असे नाही सर्व दाळी किंवा इतर कडधान्य यांच्यासाठी सुद्धा लागू पडतो. त्यामुळे काळजी पूर्वक माहिती घ्या व इतरांना सुद्धा हि माहिती शेअर करा.

सर्वात मोठी चूक जी होते ती म्हणजे आपण जो डबा घेतो त्याचे झाकण नीट लागत नाही, असे डबे चूक ही घेऊ नका. ज्या डब्याचे झाड नीट लागते तोच डबा घ्या म्हणजे काय तर हवाबंद डबा घ्या. त्याच सोबत ज्या वेळी आपण त्यात तांदूळ ठेवणार असू त्याच वेळी हा डबा स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पासून घ्याचा आहे. आणि थोडावेळ उन्हात ठेवा. ओल्या डब्यत चुकत सुद्धा कोणतीही वस्तू ठेऊन नाक.

तांदूळ ठेवण्याआधी त्यात माध्यम आकारचे खडे मीठ तेव्हा त्यानंतर तांदूळ ठेवा तसेच खडे मिठाचे काही पुरचुंडी बांधून डब्याच्या दोन तीन थरामध्ये ठेवा ज्यामुळे संपूर्ण डब्यात खडे मीठ ठेवल्यासारखे होईल. मिठाचा वापर जर एक पण तांदूळ भरताना केल्यास त्यामध्ये आद्रता कमी होते परिणामी तांदूळ हे वर्षभर नीट रहातो.

जर का आपल्या कडे कडुलिबची झाडे असतील तर त्याची पाने वाळून ती तांदळाच्या डब्यत ठेवूशकतात कारण कडुलिबच्या गुणधर्मामुळे तांदळायच्या डब्यात पोरकिडे, आळ्या तांदळाला होत नाहीत. तसेच जर का तुम्हला शक्य असेल तर लसणाच्या काही पाकळ्या सुद्धा यात ठेऊ शकतात त्याच्या वासाने सुद्धा किडे तांदळात होत नाहीत. पण काही वेळेस तांदळा सुद्धा वास लागण्याची शक्यता असते.

हे पण वाचा:- शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे. आरोग्यदायी शेवग्याच्या शेंगा..

घरात तुम्ही तांदूळ किंवा इतर धान्य ठेवताना एक काळजी नक्की घ्या ज्या ठिकाणी तुम्ही या सर्व गोष्टी साठवून ठेवणार आहेत त्या ठिकाणी हवा खेळती राहील याची काळजी घ्या. तसेच त्या ठिकाणी सूर्य प्रकाश येईल याची काळजी घ्या तसेच वर्षातुन दोन ते तीन वेळेस उन्हात ठेवा कारण त्यात आद्र्रता असेल तर लगेच निघून जाईल.