New Tata Safari
लाईफस्टाईल

प्रजासत्ताक दिवशी नवीन टाटा सफारी येणार बाजारात. जाणून घ्या पूर्ण माहीती….

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. टाटा मोटर आपली प्रसिद्ध गाडी टाटा सफारी पुन्हा बाजारात आणणार आहे . टाटा सफारी हि १९९८ ला बाजारात आली होती त्यावेळेस पासून ती भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्ज करत आहे. टाटा सफारीचे नवीन नवीन मॉडेल बाजारात येऊन गेले आता पूर्ण नवीन टाटा सफारी बाजारात येण्यास तयार आहे .

टाटा मोटर्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नवीन टाटा सफारी सात सीटर असणार आहे, तसेच हि गाडी कंपनीच्या महिन्यात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ती गाडी बाजारात दाखल होणार आहे, आधी या टाटा सफारीच नाव ग्रॅविटास होत. हि suv २०२० auto expo मध्ये सादर करण्यात आली होती. तसेच tata safari suv ची बुकिंग जानेवारी च्या शेवटी होणार आहे.

टाटा सफरीमध्ये काय असेल विशेष
टाटा मोटर्स ची टाटा सफारी OMEGARC (Optimal Modular Efficient Global Advanced Architecture) प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली असून जे ल Land Rover च्या प्लॅटफॉर्मपासून घेण्यात आले आहे .

इंजिन क्षमता

tata safari engine, इंजिन क्षमता

टाटा सफरीमध्ये डिझेल इंजिन २.० लिटर ४ सिलेंडर असण्याची शक्यता आहे. जे 170 BHP 350 NM TORK असेल तसेच हे इंजिन 6-SPEED मॅनुअल गियरबॉक्ससह 6-SPEED ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरला जोडलेलं असेल. तसेच टाटा सफारी हि गाडी पेट्रोल VERIYANT मध्ये पण येण्याची शक्यता आहे .

टाटा सफारीचा वेगळेपणा
टाटा सफारीचा डॅश बोर्ड हा टाटाची दुसरी गाडी हॉरियर सारखा असेल अशी शक्यता आहे. तसेच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील असू शकते, जे Apple कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोला सपोर्ट करेल. 7-इंच इंस्ट्रूमेंट पॅनल, प्रिमियम ओक दिलं जाऊ शकतं. तसेच गाडीमध्ये लेदर सीट, जेबीएल स्पीक्स दिले जाण्याची शक्यता आहें.

safari-rear-view

भारताच्या बाजारपेठेत टाटा सफारीची शर्यत नवीन जनरेशन Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांसारख्या SUV सोबत असेल. टाटा सफारीची किंमत किती असेल हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण टाटाच्या हॅरियरपेक्षा नवीन सफारीची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता आहे.

टाटा सफारीच्या बाहेरील भागाबद्दल बोलायचं झाल्यास सफारीचा समोरील अर्धा भाग हॅरियरसारखा दिसेल तसेच पाठीमागील भागामध्ये किंचित बदल झालेला दिसेल तसेच नवीन प्रकारचे अॅलोय व्हील्स असू शकतात. टाटा सफारी मध्ये सहा एअर बॅग्स आणि ABS SYSTEM असू शकते.
नवीन लुक मधील टाटा सफारी ग्राहकांना पसंतीस पडेल अशी अपेक्षा करू. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.