लाईफस्टाईल

आपल्याला राग येतो ह्या रागाला औषध आहे का ? हि एक गोष्ट नक्की वाचा.

श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो राग हा प्रेत्येकालाच येतो पण ह्या रागावर औषध आहे का हेच आपण आजच्या कथेतून जाणून घेऊयात. परसात नावाचे एक नगर होते त्या नगरात एक व्यापारी राहत असे, ह्या व्यापाऱ्याचा स्वभाव मात्र खूप तापट होता. थोडं काही मनाविरुद्ध झाले कि त्याला जॅम संताप येत असे.

त्याच्या ह्याच रागीट स्वभावामुळे त्याच आपल्या मित्रांसोबत, घरातले, नातेवाईक, शेजारीपाजारी ह्यांच्याशी काही जमत नसे एवढेच नाही तर त्याच्या ह्या रागीट स्वभावामुळे त्याचे त्याच्या व्यापारात देखील खूप मोठे नुकसान होत असे. एके दिवशी तो आपल्या मित्रासोबत आपल्याच रागाबद्दल बोलत होता. त्यावर त्याच्या मित्राने त्याला एक सल्ला देत म्हणाला कि शेजारी एक टेकडीवर एक संत महाराज राहतात तू त्यांच्याकडे जा त्यांची भेट घे त्यांना ह्याबद्दल सांग कदाचित ते तुला नक्कीच मदत करतील.

मित्राचे सल्ला त्याने मनावर घेतला व तो व्यापारी लगेच दुसऱ्या दिवशी त्या संत महात्माजवळ गेला. गेल्यानंतर सर्व व्यापाऱ्याने आपल्या रागबद्दल संताला सांगितले. संताने सर्व त्याचे ऐकून घेतले व त्यानंतर त्याला एक भरलेली बाटली दिली आणि ते त्याला म्हणाले कि हे रागावरचे औषध आहे. ज्या ज्या वेळी तुला राग येईल त्यावेळी तू ह्यातील ४ थेंब औषध जिभेवर ठेव व त्यानंतर ते तसेच जिभेवर तोंड बंद करून १० मिनटे ठेवायचे व नंतर ते गिळायचे.

व्यापारी हे औषध घेऊन घरी आला. ज्या वेळी त्याला राग येत असे तो व्यापारी संतांनी दिलेले औषध अगदी सांगितल्याप्रमाणे दहा मिनटे तोंडात ठेवून नंतर तो गिळत असे. थोड्याच दिवसात त्याला जाणवले कि त्याचा राग हा औषध घेतले कि शांत होत आहे. आता त्याचे सर्वांबरोबर घरच्यांबरोबर मित्रांसोबत पटायला लागते. तसेच तो आता त्याच्या व्यापारात देखील जास्त प्रगती करू लागतो.

व्यापारी त्या महान संतांचे आभार मानण्यासाठी त्यांच्याकडे जातो. तिथे गेल्यावर तो त्यांना सांगतो कि तुम्ही दिलेले औषध हे खूप गुणकारी आहे ह्या औषधामुळे मी माझ्या रागावर नियंत्रण करू लागलो आहे. मी खरंच तुमचे उपकार कसे फेडू मलाच कळत नाही तुमचे खूप आभार आहे असे व्यापारी संतांना बोलतो. मला कृपा करून एक अजून औषधाची बाटली द्या.

संतांनी हसत त्या व्यपाऱ्याला बोल्त म्हणाले कि हे औषध माझ्याकडे नाही तर तुझ्या कडेच आहे मी दिलेली बाटलीत फक्त पाणी होते अजून काहीच नाही पण तू राग आल्यावर जे १० मिनटे शांत राहिलास तेच खरे औषध होते. संत त्याला बोलले कि बऱ्याच वेळा राग आल्यावर आपण आपल्या जवळच्या माणसाला सुद्धा खूप टोचून बोलतो कारण राग आला कि आपण बिन विचार करता बोलतो, त्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते. त्या माणसाला दुखावल्यावर आपल्याला पश्चाताप होतो कि आपण असा रागाच्या भरात बोलायला नको होत.

म्हणून राग आल्यावर जर आपण शांत राहिलो तर आपण विचार करून बोलू शकू आणि परत आपल्याला पाश्च्याताप करावा लागणार नाही. व्यापाराची हि गोष्ट मनापासून पटली आणि तो समाधानाने घरी परतला कारण आता त्याला रागावर कायमच औषध सापडले होते. मित्रांनो अशा करतो कि हि अगदी छोटीशी कथा तुम्हाला आवडली असावी आणि तुम्ही देखील रागावर अश्या प्रकारे नियंत्रण ठेवा ह्याच औषधाचा वापर करा. मित्रांनो ह्या औषधाबद्दल तुमच्या इतर मित्रांना देखील सांगा त्यासाठी आजचा लेख त्यांना देखील शेयर करा.