श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिशी नक्की या वस्तू घरी घेऊन या. , Bring this item home on Shri Krishna Janmashtami.
धार्मिक

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिशी नक्की या वस्तू घरी घेऊन या. नशीब नक्की बदलेल.

श्रावण महिण्यात श्री कृष्ण अष्टमीस आपण सर्व जण श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो. यंदा श्री कृष्ण जन्माष्टमी गुरवारी मध्य रात्री साजरी कायची आहे. तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाळा असणार आहे. त्यामुळे सर्व भक्तांनी गुरुवारी श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यसाठी तयारी करायची आहे. श्री कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती आधीच्या लेखात दिली आहे.

आज आपण अशा काही वस्तू बद्दल जाणून घेणार आहोत. ज्या आपण श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिशी आवर्जून आणल्या पाहिजेत. अशा काही वस्तू आहेत ज्या पैकी एक तरी वस्तू आल्या घरी नक्की आणली पाहिजे. यावर्षी काही अत्यंत शुभ संयोग जुळून आलेले आहेत. वर्द्धि आणि ध्रुव योग जुळून आलेले आहेत. हे दोन्ही योग माता लक्ष्मी याना प्रसन्न करून घेण्यासाठी खुप चांगले मानले जाते.

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या पहिली वस्तू आहे, ती म्हणजे गाय आणि वासरू एकत्र असलेली वस्तू आपल्याला घरी घेऊन याचे आहे. गाय वासरू यांची प्रतिमा किंवा मूर्ती हि आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात ठेवायही आहे. पूर्व आणि उत्तर यामधली दिशा म्हणजे ईशान्य होय. प्राचीन काळी गायला धन मानले जायचे. तसेच गाय वासरू एकत्र घरी आणल्यास आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो. तसेच श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिशी गाय आणि वासरू यांची पूजा केल्यास घरात सुख समुद्धी निर्माण होते.

दुसरी वस्तू म्हणजे मोरपंख. मोरपंखा बद्दल एक कथा सागितली जाते. मोरपंख हे श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. तसेच मोरपंख हे श्री कृष्णाने आपल्या मस्तकी धारण केले आहे. त्यामुळे त्याचे पूजा नक्की करावी. तसेच वास्तूशास्त्रा नुसार ज्या घरात मोरपंख आहे अशा घरात अमंगळ, चुकीच्या आणि अशुभ गोष्टी घडत नाही. तसेच सकारात्मक गोष्टी आपल्या घराकडे ओढल्या जातात. घरात काही दोष असतील तर त्या सुद्धा दूर होण्यसाठी मदत होते. त्यामुळे एकतरी मोरपंख नक्की घरी घेऊन या. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिशी मोरपंख नक्की घेऊन या.

तिसरी वस्तू म्हणजे बासरी हे एक प्रमचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. तसेच श्रीकृष्णाच्या सर्वात प्रिया वस्तू पैकी एक आहे. संपूर्ण सृष्टीत प्रेमाचे प्रतीक म्हणजे बासरी आहे. बासरी जर का आपण घरात ठेवली तर घरातील वस्तू दोष कमी होतो. तसेच पती पत्नी मध्ये सतत वाद विवाद होत असतील तर बेडरूम मध्ये नक्की एक बासरी ठेवावी. त्याच सोबत घरातील सर्व लोक ज्या ठिकाणी एकत्र जास्त वेळ घालवतात त्या ठकाणी बासरी नक्की ठेवून दयावी ती सुद्धा आडवी बासरी आधीही सरळ किंवा उभी ठेऊनये.

त्याच सोबत घरात भगवत गीता नक्की घरात घेऊ यावे जर का तुम्हला शक्य असेल तर काही लोकांना भगवत गीता अवश्य दान करावी. हे सुद्धा एक पुण्याचे काम आहे. तसेच याच दिवशी एक तरी अध्याय नक्की वाचावा.

हे पण वाचा :- अशा पद्धतीने करा श्री कृष्ण जन्माष्टमीची पूजा.

बोला कृष्ण कन्हया लाल कि जय, कृष्ण कन्हया लाल कि जय. !!जय श्री कृष्ण!! !!जय श्री कृष्ण!! सर्वाना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्या.. 

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.