दुसऱ्या श्रावण सोमवारी ही एक वस्तू शिवलिंगावर अर्पण करा.
धार्मिक

दुसऱ्या श्रावण सोमवारी ही एक वस्तू शिवलिंगावर अर्पण करा.

सध्या श्रावण महिना सुरु आहे. येत्या काही दिवसात दुसरा श्रावण सोमवार येणार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा आणि उपासना करतो त्याना प्रसन्न करून घेतो. अशी मान्यता आहे जर का आपण महादेवाची पूजा आणि उपासना मनापसून केल्यास त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्याला येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण होते.

विशेष म्हणजे श्रावण महिनातील सोमवारी एक विशेष महत्व आहे. सोमवारी एखादी छोटीशी उपासना सुद्धा केली तरी त्या उपासनेला खुप महत्व आहे. आज पण श्रावणी सोमवारी कोणकोणते उपाय आहेत ज्या मुळे आपल्या असंख्य लाभ मिळतील. पण अनेक वेळा असे सुद्धा होते कि कित्येक भक्त मनापसून पूजा अर्चा करतात तरी सध्या त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. अशा वेळी काही छोट्याशा चुका आपल्या हातून होत असतात त्या आपला लवकर लक्षात येत नाहीत त्यामुळे आपल्या उपासनेचा लाभ मिळत नाही.

काही चुका ज्या वारंवार करत असतो त्यामुळे आपल्याला भगवान महादेवाचं आशीर्वाद मिळत नाही. श्रावण महिन्यात काही वस्तूंचे सेवन करणे सोडले पाहिजे . कांदा , लसूण, वांगी इत्यादी गोष्टी सोडल्या पाहिजे. त्याच सोबत सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यात नॉनव्हेज खाणे कटाक्षाने खाणे सोडले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे वेसण करणे कटाक्षाने टाळा. या महिन्यभरात फक्त सात्विक भोजन घ्या. यामुळे उपासनेत कोणतीच बाधा येणार नाही.

असे मान्यता येते कि संपूर्ण श्रावण महिना हा देवनाची उपसा करण्यासाठीचा आहे. अशा वेळी आपण देवी देवीदेवतांची उपासना करताना किंवा मंत्र जप करताना मनात कोणाबद्दल सुद्धा वाईट विचार अनु नका तसेच इतरांना सोबत विनाकारण वादविवाद होतील असे कृत्य करू नका. तसेच संपूर्ण महिन्यात एखादे चांगले कार्य करत रहा. या महिन्यात एकदा प्रन करा ज्यामुळे स्वतःचे आणि इतरांचे दिवस चांगले जाईल यासाठी एखादे कार्य हाती घ्या.

श्रावण महिन्यात आपण पूजा करतो उपासना करतो अशा वेळी आपल्या हातून काही चुका होत असतात. उपासना करोत पण सकाळी ब्रम्ह मुहूर्त ज्या वेळी असतो त्या वेळी उठून आपले नित्य कार्य पूर्ण करून उपासना सुरु करावी. काही व्यक्ती पूजा करतात उपासना करता पण सकाळी लवकर उठत नाहीत. सकाळी लवकर न उठणे हे वाईट कृत्य मानले जाते. त्यामुळे सकाळी लवकर उठणे आणि पूजा करून उपासना करावी.

काही वस्तू अशा आहे ज्या श्रावणी सोमवारी अवश्य शिवलींगावर अर्पण करणे आवश्यक आहेत. जसेकी बेलपत्र अवश्य अर्पण करावे त्याच सोबत, धोत्र्याची फुले, गाईच कच्च दूध आणि जल अवश्य अर्पण करावे. सोबतमूठ भर अक्षदा अर्पण कराव्यात. जर का तुम्हला शक्य असेल तर पंचामृत तयार करून ते सुद्धा शिवलिंगावर अर्पण करावे. पंचामृत तयार करताना दूध, दही, तूप, साखर आणि मध यापासून पंचामृत तयार करावे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.