धार्मिक

११ जानेवारी श्री महालक्ष्मी मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन-व्रत …

मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी गुरुवारी व्रत कसे करावे आणि गुरुवारची उद्यापन कधी करावे असे अनेक प्रश्न अनेक स्त्रियांना पडलेले आहेत.कारण ११ जानेवारीला म्हणजेच गुरुवारी अमावस्या आलेली आहे,त्यामुळे या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करावे कि नाही असे सगळ्याच्या मनात येत आहे.

मागील वर्षात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु तेव्हा गुरुवारी पहाटे अमावस्या संपली होती.पहाटे अमावश्या संपल्यामुळे आपण मागच्या वर्षी फक्त उपवास केला होता.या दिवशी गुरुवारची उद्यापन केले नव्हते.

या वर्षी या गुरुवारी ११ जानेवारीच्या आधीच्या बुधवारीच अमावश्या चालू होत आहे .त्यामुळे गुरुवारी अमावस्या असली तरी गुरुवारचे व्रत आणि गुरुवारचे उद्यापन हे आपण या दिवशी करू शकतो. जसे कि आपण दिवाळीत अमावस्या असते तेव्हा आपण लक्ष्मीपुजन करतो. तसाच योग् हा या वर्षी आलेला आहे.

११ जानेवारी या दिवशी आपल्याला लक्ष्मी देवीची पूजा करायला संधी मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो गुरुवारी ११ जानेवारी या दिवशी तुम्ही मनोभावे पूजा करू शकता .या योगामुळे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे आपण गुरुवारी पहाटे पासूनच करू शकतो. तसेच पूजा,कहाणी आणि आरती हि सकाळी केली जाऊ शकते. परंतु दिवसभर उपवास करून संध्याकाळी नैवेद्य आणि आरती करावी.उद्यापनाच्या दिवशी संध्याकाळी आरती आणि नैवेद्य झाल्यानंतर दूध ,साखर आणि पोह्याचा नैवेद्य हा दाखवावा. तसेच देवीला मनोभावे प्रार्थना करावी.

मित्रानो तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावर हळदी-कुंकू वाहून आणि कलश हलवून पूजा काढून घ्यावी.तो कलशाचा नारळ हा वाहत्या पाण्यात सोडून द्यावा. तसेच पूजा काढताना अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणावे. त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी प्रसन्न राहते आणि आपल्या घरात भरभराट होते.