मित्रानो , जर तुम्हाला शनी देवाची साडेसाती चालू असेल तर तुम्ही खूप कष्ट केले तरी तुम्हाला यश हे मिळत नाही. तुमची सगळी कामे हि अपूर्णच राहतात,तसेच तुम्हाला यश हे लवकर मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला काम करण्याचा उत्साहच निघून जातो, त्यामुळे काम करण्याची इच्छा हि निघून जाते. त्यामुळे साडेसाती हि चालू असेल तर हे सगळं असच होत.
मित्रानो शनीचा दोष ज्यांना असतो, अश्या लोकांना कोणत्याच कामात यश येत नाही तसेच शनीचा दोष जर विदयार्थ्यांना असेल तर त्यांना देखील कास्यातच यश येत नाही, त्यांनी खूप अभ्यास केला तरी त्यांना त्याचा काही होत नाही त्यांना अपयशच येत राहत.
तुम्हाला जर शनीचा दोष असेल तर सगळ्यात आधी तुमचे आरोग्य बिघडते,तुम्हाला पोटाचे आजार होतात. तसेच तुमच्या फॅमिली मध्ये देखील आजारपण येत, त्याच्या आरोग्य बिघडते आणि तुमची आर्थिक नुकसान अजून होते.
मित्रानो तुम्हला जर शनीचा दोष दूर करायचा असेल तर हा उपाय तुम्ही फक्त एका शनिवारी केला तरी तुमचा शनीचा दोष हा दूर होऊ शकतो, तसेच तुमची आर्थिक स्तिथी हि चांगली होऊ शकते. तसेच तुम्हला तुमच्या क्षेत्रात चांगले यश हे मिळू शकते. तसेच तुमचे आजारपण दूर होऊ शकतात.
मित्रानो शनीची साडेसाती दूर करण्यासाठी आपण हा उपाय फक्त एका शनीवारी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक स्टीलचा तांब्या काळा दोरा आणि खडीसाखर घ्यायची आहे.शनिवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपण एका पिंपळाच्या झाड खाली जायचं आहे. जाताना हे सगळं साहित्य घेऊन जायचं आहे आणि त्या तांब्यात पाणी पण भरून घेऊन जायचं आहे आणि त्या पाण्यात खडीसाखर टाकून घायची आहे
त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान आणि शनिदेवांना प्रार्थना करायची आहे. आणलेलं पाणी त्या पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे आणि काळा दोरा घेऊन आपल्याला सात वेळा तो दोरा गुंडाळत सात फेऱ्या मारायच्या आहेत आणि , “ओम शने शने चराय नमः” हा मंत्र म्हणायचं आहे, आणि सात फेऱ्या मारून झाल्यावर तो दोरा तिथेच ठेवायचा आहे घरी घेऊन जायचं नाही.
एक दिवा लावायचा आहे आणि शनी देवाला प्रार्थना करायची आहे आणि शांत मनानी बसायचं आणि शनी देवाची प्रार्थना करायची आहे आहे.असे केल्यास तुम्हला फायदा होणार आहे , तुमचा शनी दोष दूर होण्यास मदत होईल.