आरोग्य

आहारात फक्त या पदार्थांचा समावेश करा आणि चष्मा घालणे कायमचेच सोडा…

आपल्या शरीराचा महत्वाचा भाग म्हणजे डोळे आहेत. कारण या डोळ्यांनी आपण सगळे जग हे पाहू शकतो.आपल्या डोळ्यांना जर कमी दिसायला लागलं किंवा डोळे हे दुखायला लागले की आपण नेह्मी चष्मा किंवा लेन्स वापरतो. तसेच चष्मा हा बऱ्याच जणांना घालायला आवडत नाही. परंतु चष्मा हा घालणंही गरजेचं असत.

मित्रांनो मी आज तुम्हाला काही असे घरगुती उपाय सांगणार आहे कि त्यामुळे तुमचा चष्मा घालणं हे नक्कीच कमी होईल आणि तुम्ही चष्मा न घालता फिरू शकाल. त्यासाठी तुम्हाला ह्या घरातील काही पदार्थाचा समावेश तुमच्या आहारात हा नियमित केला पाहिजे.तर ते कोणते पदार्थ आहेत हे आपण सविस्तररिया खालील प्रमाणे पाहुयात.

१)मासे :-मित्रानो तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही मासे हे नक्की खाल्ले पाहिजेत. कारण माश्यात ओमेगा -३ फॅटी ऍसिड हे भरपूर प्रमाणात असतात.त्यामुळे तुमच्या डोळ्याचे आरोग्य हे सुधारते आणि तुम्ही जर व्हेजिटेरियन असलात तर तुम्ही फिश ऑइल चा वापर करू शकता असे जर तुम्ही केले तर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य हे नक्की सुधारू शकते.

२)अक्रोड :-मित्रानो आक्रोड हे आपल्या आरोग्यास खूप चांगले असते. आक्रोड मध्ये व्हिट्यामिन ई आणि ओमेगा फॅटी ऍसिड हे जास्त प्रमाणात असते आणि हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय चांगले असते. आक्रोड हे तुम्ही रोज सकाळी नाश्त्याबरोबर खाऊ शकता . आक्रोडमध्ये कॅलरीज चे प्रमाण हे अधिक असते . त्यामुळे आक्रोड हे प्रमाणातच खावेत.

३)गाजर:-मित्रानो गाजर हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. गाजर हे नियमित खाल्ले पाहिजे. गाजर हे आपल्या डोळ्यांसाठी तर खूप फायदेशीर असते.गाजर हे आपण सलाड,कोशिंबीर अश्या विविध प्रकारे खाऊ शकतो. गाजरामध्ये व्हिट्यामिन ए आणि विटा कॅरोटीन हे अधिक असते . त्यामुळे आपले डोळ्यांना संसर्ग हा होत नाही. त्यामुळे गाजर खाणे हे खूप चांगले असते. त्यामुळे आपण आपल्या आहारात गाजराचे सेवन रोज केले पाहिजे.

४)अंडी :-मित्रानो अंडे हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. अंड्यामध्ये व्हिट्यामिन ए आणि ल्युटीन हे अधिक प्रमाणात असते. ते आपल्या डोळ्यांसाठी चांगले असते . त्यामुळे आपल्या डोळ्याचे आरोग्य चांगले होते. त्यामुळे तुम्ही दररोज एक उकडलेले अंडे खाणे गरजेचे आहे किंवा अंड्याचं आम्लेट खाल्लं तरी चालेले.तुमच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी तुम्ही अंडे हे खाणं गरजेचं आहे.

५)फळे :-फळे हि दररोज खाल्ली तर आपले आरोग्य चांगले राहते. त्यामुळे दररोज एक तर फळ हे खाल्लं पाहिजे.तसेच व्हिट्यामिन सी असलेली फळे हि खाल्यानी आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारते.तसेच आपल्या डोळ्याची दृष्टी हि वाढण्यास मदत होते. तसेच आपली रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते.त्यामुळे आपल्या आहारात दररोज फळांचा समावेश हा केलाच पाहिजे.