नमस्कार मित्रांनो तुमचे मराठी एन्टरटेन ह्या वेबसाइट वरती खूप स्वागत आहे. मित्रांनो अनेक लोक आहेत ज्यांना आपले सुख पाहवत नाही ते आपल्यावर जळतात त्यांची वाईट नजर हि आपल्या घरात नजरदोष उत्पन्न करते. अनेकदा आपल्या हातून तोंडून कोणाचातरी अपमान घडतो काही तरी होते आणि त्याच्याकडून शिव्या शाप आपल्याला लागतात. अश्या वेळी घरातील पैसा येतो तो येईचा कमी होतो. लक्ष्मी अश्या घरात वास करत नाही, घरात नेहमी भांडणे वाद निर्माण होतात. ह्या वरती उपाय काय, तर मित्रांनो सर्वप्रथम तर तुम्ही एखाद्याला वाईट बोलणे, अपमान करणे ह्या गोष्टी सोडून द्या.
दुसरी गोष्ट तुमचे सुख, तुमचा आनंद हा इतरांना दाखवत बसू नका, कारण जी हि नजर असते ती तुमच्यासाठीच घातक होऊ शकते. तुमच्या घरात कोणती समस्या आहेत जसे कि एखाद्या वेळी घरात गेलं कि लगेचच अस्वस्थ वाटू लागते. तुम्ही बाहेर गेला चांगले वाटते मात्र घरात गेला कि एक प्रकारची अस्वस्थता वाटू लागते. घरापेक्षा बाहेर तुमचे मन जास्त रमत असेल तर त्या घरात काही ना काही दोष नक्की आहे. कधी कधी वास्तुदोष असतात.
ह्या सर्वांवर एकच उपाय आहे जो हमखास ह्या सर्वांवर प्रभावकारी ठरणार आहे, आजच्या लेखात आपण तेच सांगणार आहोत. मित्रांनो २८ जून २०२२ मंगळावर आहे आणि ह्या दिवशी ज्येष्ठ अमावस्या आलेली आहे. तर ह्या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी आपण हा एक आपण छोटासा उपाय आपण घरी करून नक्की पहा. हा उपाय आपण २८ जूनला सूर्य मावळल्यानंतर करायचा आहे.
उपाय करण्यासाठी आपल्याला काही सामग्री लागणार आहे त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी आपण अर्धा किंवा एक चमचा घ्याचा आहे. त्यानंतर आपण भीमसेनी कापूर घ्याचा आहे, हा कापूर जर भीमसेनी असेल तर आणखी चांगले नाहीतर आपण साधा कापूर देखील वापरू शकता. सोबत आपण थोडीशी काळी मिरी त्याची आपण पूड करून घ्याची आहे.
नंतर आपण हिंग घ्याचे आहे, अश्या सर्व वस्तू आपण एकत्र करून आपण त्याची एक गोळी बनवायची आहे. हि गोळी आपण एकत्रित सर्व बांधण्यासाठी आपण तुपाचा वापर करा तूप हे गाईचे असावे. तर अशी गोळी आपण जळायची आहे, आता हि गोळी जाळण्यापूर्वी तुमची कोणत्या देवीदेवतेवर श्रद्धा असेल त्या देवीदेतांचा जप तो तुम्हाला येतो असा जप आपण करायचा आहे, अगदी तुम्ही गुरुदेव दत्त ह्यांच्या जप केला तरी चालेल तुमच्यावर घरावर जी काही वाईट नजर लागलेली असेल ती नजर दूर होईल.
गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त असे नामस्मरण करत जरी आपण हि गोळी जाळली तरी चालेल हि गोळी जळताना आपण एका वाटीत घ्या व त्यानंतर ती वाटी एका ताटात ठेवावी जेणेकरून तुम्हाला ते भाजनार नाही. ह्या गोळी जाळल्यानंतर त्याचा जो धूर येईल तो आपण संपूर्ण घरात फिरवायचा आहे. अगदी घरातील टॉयलेट असेल किंवा एखादी अंधारी खोली असेल त्या ठिकाणी आपण हा धूप अवश्य घेऊन जा. अश्या प्रकारे आपण हा उपाय करून पहा तुमच्यावर लागलेली कसलीही नजर असूद्यात किंवा काही आणखी वाईट नजर शक्ती सर्व काही निघून जाईल.
मित्रांनो हा उपाय करताना तुमची श्रद्धा असणे तुम्ही ज्या देवतेचे नामस्मरण करत आहात त्यावर विश्वास असणे फार महत्वाचे आहे कारण त्याशिवाय हा उपाय फळास जात नाही. तर मित्रांनो आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाइक करा तसेच लेखाच्या शेवटी तुमच्या आवडत्या देवीदेवतेचे नाव लिहण्यास विसरू नका.
टीप: वर लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यता ह्यांच्या आधारे दिली गेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नका, धन्यवाद.