हिंदी मालिका मधील सर्वात लोकप्रिय रियल्टी शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. या सीजन मधील पहिला करोडपती मिळाला आहे. कौन बनेगा करोडपतीच्या शो मध्ये दुसऱ्या प्रयत्नात कोल्हापूर मधील कविता चावला करोडपती झाली आहे. तिने एका इंटरव्हिव मध्ये संगितले आहे कि या ठिकाणी येण्यासाठी बरेच परिश्रम केले आहे. बऱ्याच अडचणींना तोंड सुद्धा दयावे लागले आहे.
जो आनंद मला झाला आहे त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. मी खुप मोठा प्रवास केला आहे. या शो दरम्यान मी बऱ्याच वेळेस म्हणाले कि कासवाच्या गतीने इतपर्यंत पोहोंचली आहे. या प्रवासात अनेक संकटे आणि अडचणी आल्या. पण जे काही आज मला मिळाले आहे. त्यापुढे या सर्व अडचणी आणि संकटे खुप छोटी वाटत आहेत. या सिजनची करोडपती कविता चावला यांचे म्हणणे आहे.
वीस रुपय ते कोटींचा प्रवास .
कविता आपल्या प्रवास बद्दल संगताना. ती म्हणाली माझ्या माहेरची परिस्थिती तशी बिकट होती. आम्ही चार भांवंड आहोत. आई शिवण काम करून घर चालत असे. आणि त्यातून येणाऱ्या पैशातून आमचे शिक्षण झाले तेच घर सुद्धा चालत असे. आईला काहीतरी मदत झाली पाहिजे म्हणून मी सुद्धा शिवण काम करत असे. १२वि पूर्ण झाली कि आईला मदत करण्यास सुरवात केली. रोज आठ तास मी काम करत असे. रोज इतक्या वेळ काम केल्यास मला फक्त वीस रुपया मिळत असे.
वीस रुपयांपसून केलेली सुरुवात हि तीस लाख वीस हजारांपर्यंत येण्यासाठी मला तीस वर्ष लागले. इतकी सर्वात मोठी कमाई मला केबीसीच्या प्लॅटफॉर्मवरून मिळाली. या सीजन मध्ये मला एक करोड रुपय मिळाले. या साठी मला खुप कष्ट तर करावे लागलेच शिवाय त्या साठी खुप मोठा वेळ सुद्धा लागला.
२००० पासून या शो मध्ये जायचे स्वप्न पहिले होते.
ज्या वेळेस पहिल्यांदा हा शो आला त्या दिवसपूसन या शो मध्ये भाग घ्याचा असे ठरवले होते. जे काही वचण्यासाठी मिळेल ते मी वाचत असे. तसेच न्यूज पेपर रोज वाचून त्यामधील बऱ्याच गोष्टी कातरून त्याचे वाचन करणे. तसेच मुलानचा अभ्यास घेत असताना स्वतः सुद्धा अभ्यास करत असे. कदाचित तुम्हला विश्वास बसणार नाही मी फक्त १२वि पास आहे. तरी सुद्धा मी २२वीस वर्ष अभ्यास करत होती.
या वर्षांमध्ये बऱ्याच गोष्टी त्याग कराव्या लागल्या. सर्वात मोठी गोष्ट मला सोडावी लागली ती म्हणजे झोप, तसेच मी इतरांना सुद्धा कमी वेळ देत होती. काही तरी करणे सांगून मी घरी येत असे आणि अभ्यास करत असे. त्यामुळे सुद्धा बरेच व्यक्ती मझ्यापासून दूर गेले. माझी दुनिया फक्त माझे घर आणि केबीसी ची तयारी या दोन गोष्टी पुरते होते. इतरांना खोटी कारणे सांगून केबीसीचा अभ्यास करत असे.
मुलाच्या शिक्षणावरती करणार खर्च.
कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेवर कविता सांगते, मी फक्त माझ्या पतीला फोन करून माझ्या विजयाची माहिती दिली. मला माझ्या सासूला किंवा कुटुंबाला आश्चर्यचकित करायचे होते. माझा मुलगा 22 वर्षांचा आहे. त्याच्या अभ्यासासाठी आम्ही खूप कर्ज घेतले होते. आधी क्लिअर करू. त्यानतंर त्याला परदेशात जाण्यसाठी जो काही पैसा लागणार आहे त्या साठी खर्च केला जाईल.