धनाची देवता कुबर यंत्र घरात या ठिकाणी ठेवा. घरातील आर्थिक समस्या संपेल. कुबेर यंत्राची स्थापना कधी करावी. कुबेर यंत्राची पूजा कधी करावी.
धार्मिक

धनाची देवता कुबेर यंत्र, घरात या ठिकाणी ठेवा. घरातील आर्थिक समस्या संपेल.

धनाची देवता कुबेर यांचे यंत्र ज्या घरात असते त्या घरात पैसा काहीच कमी पडत नाही. त्याच सोबत त्या घरात बुद्धी आणि सुखदा सुद्धा कधीच कमी पडत नाही. तुम्हाला माहीत असेल कुबेर देवता हे धनाचे अधिपती आहेत. ज्या घरात रोज कुबेर देवाची किंवा कुबेर यंत्राची पूजा होत असते त्या घरात कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही तसेच त्या घरात बुद्धिमता सुद्धा कमी होत नाही. जी व्यक्ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने कुबेर यंत्राची पूजा करते त्या व्यक्तीला कधीच पैसा कमी पडत नाही.

कुबेर यंत्राची मानपासून पूजा केल्यास त्या व्यक्तीला अनेक कामात यश मिळत रहाते. अनेक चांगल्या मार्गाने पैसा येत राहतो. उदयोग, व्यवसाय, यामध्ये यश येऊन पैसा मिळत रहातो. पण बऱ्याच लोकांना हे यंत्र घरी कधी घेऊन यावे, त्याचीपूजा कशी करायची, आणि हे यंत्र घरात कोठे ठेवायचे याबद्दल माहिती नसते. त्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. आजच्या लेखात आपण या सर्व गोष्टी सविस्तर पहाणार आहोत.

कुबेर यंत्राची स्थापना कधी करावी.

सर्वात पहिला नियम म्हणजे कुबेर यंत्र घरात कधी स्थापन केले पाहिजे. कुबेर यंत्र घरात शुक्रवारी स्थापित करावे. त्याच जर का तिथी चा विचार केला गेला तर अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग ज्या शुक्रवारी येतात त्या दिवशी केल्यास त्याचा जास्त लाभ मिळतो. या दोन्ही तिथी ज्या शुक्रवारी येतात तो शुक्रवार सर्वात उत्तम मानला गेला आहे कुबेर यंत्र स्थापन करण्यसाठी. यापेक्षा दुसरा सर्वात चांगला दिवस म्हणजे धनत्रयेस हा दिवस जो दिवाळीच्या आधी येतो तो दिवस.

हे पण वाचा :- पळणाऱ्या सात घोड्यांचा फोटो का लावतात घरात. तुम्हाला हे माहित आहे का?

कुबेर यंत्रा या दिशेला ठेवा.

या यंत्राची स्थापना आपण आपल्या दुकानात, करखान्यात, घरातील देवघात करू शकतात. या मध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, कुबेर यंत्रा सोबत मातालक्ष्मी आणि गणपती देवांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी कुबेर यंत्र एकटे ठेऊ नये. बऱ्याच घरात असे होत असते कि घरात पैसा येत असतो. पण आलेला पैसा लगेच कोणत्या ना कोणत्या मार्गाने लगेच जातो अशा घरात नक्की कुबेर यंत्र ठेऊन त्याची पूजा करावी.

कुबेर देवता लगेच प्रसन्न होते. पण माता लक्ष्मी आणि श्री गणपती यांची पूजा कुबेर यंत्रा सोबत नक्की करावी. उत्तर दिशेचे स्वामी हे कुबेर देव आहेत. त्यामुळे आपल्या घरातील उत्तर दिशा हि नेहमी स्वच्छ आणि साफ ठेवावी. त्याच सोबत उत्तर दिशेला तांब्याचा ताब्यात पाणी भरून त्यावर एक नारळ ठेऊन त्याची रोज पूजा करावी यामुळे सुद्धा घरात सुख समृद्धी येते. त्याच सोबत कुबेर यंत्राचे लाभ जास्त स्वरूपात आणि लवकर मिळतात.

कुबेर यंत्राची पूजा कधी करावी.

ज्या वेळी आपण यंत्र खरेदी करणार आहेत. त्या त्यावेळेस काही महत्वाच्या गोष्टी कडे अवश्य लक्ष द्या. या यंत्रामध्ये पाच महत्वाच्या आकृत्या आहेत का हे नक्की तपासून पहा. या पाच आकृत्या पंचत्वचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असतात. आकाश, वायू, जल, अग्नी, पृथ्वी हि पाचतत्वे आपल्या यंत्रात असायला हवे. रोज आपल्या हातून या पंचत्वांची पूजा होत असते त्यामुळे ब्रह्माण्डतील सर्व शक्ती आल्याला आशीर्वाद देत असतात.

हे पण वाचा :- निर्माल्यातिल फुलांचा घरगुती उपाय. ते फेकून देऊ नका घराबाहेर.

आपल्या घरातील देवांची पूजा झाल्यावर कुबेर यंत्राची पूजा करावी. त्यानतंर ” ॐ कुबेराय नमः ” या मंत्राचा जप करावा. तसेच जर का कुबेरयंत्र खराब झाले असेल तर ते वाहत्या पाण्यात विसर्जति करावे आणि त्याच दिवशी दुसरे कुबेर यंत्र स्थापन करावे. अमावस्या तिथीला आपल्या तिजोरीत हे यंत्र ठेऊन पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मूळ जागी हे यंत्र ठेऊन द्यावे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.