किचन टिप्स लाईफस्टाईल

नवीन किचन टिप्स वाचल्यावर तुम्ही देखील म्हनचाल कि आधी का सांगितल्या नाही बरे. kitchn tips

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो स्वयंपाक करणे ही एक कला आहे पण स्वयंपाककरताना किचन मध्ये काही गोष्टींची काळजी घेणे देखील आवश्यक आहेत, कारण आपण काही पदार्थ बनवत असताना थोडासा आपला निष्काळजीपणा त्या संपूर्ण पदार्थाची चव खराब करतो जसे की त्या पदार्थात जास्त मीठ झाले किंवा भाज्या जळणे. अशा अणे प्रकारे चुका आहेत ज्यामुळे आपले नुकसान होते व पदार्थांची नासाडी देखील होते. कधी-कधी अगदी लहान गोष्ट असते ज्यामुळे आपले पदार्थ चुकतात व ते वाया जातात आणि आपला तो पदार्थ करण्यासाठी वेळ जातो तो वेगळेच.

तुम्ही देखील स्ववयंपाक बनवसण्यासाठी उत्सुक असतात तर आजच्या लेखातील ह्या काही खास टिप्स तुमच्या उपयोगी नक्की येतील. ह्या टिप्स खूप फायदेशीर आहेत त्यामुळे तुम्ही देखील ह्या टिप्स व्यवस्थित वाचा.

१० बेस्ट किचन टिप्स:

१. गुळाचा पाक बनवताना कढईत थोडे तूप किंवा तेल टाकले तर त्याचा पाक हा तव्याला चिकटणार नाही अगदी तसेच साखरेसाठी देखील टीप आहे.

२. गुलाबजाम आतून खूप मऊ लुसलुशीत आणि अगदी रसाळ बनवण्यासाठी खाव्यात आपण थोडे पनीर घालून मिक्स करा ह्यामुळे तुमचे गुलाबजाम खूप रसदार, मऊ व स्वादिष्ट होइल.

३. तूप बनवताना आपण जी साई एकत्रित करतो त्यात जर आपण एक चमचा साखर टाकली तर लोणी जास्त येते.

४. जर दही ववस्थीत घट्ट बनत नसेल तर, एका सपाट ताटात पाणी घेऊन त्यात दही बनवायचे ते भांडे ठेवावे, त्यानंतर आपण पाहचाल कि एक तासात दही तयार होईल. पण भांडे हे स्थिर अवस्थेत ठेवावे ते हलू देऊ नका.

५. कैरीचे लोणचे आपण बनवतो मात्र ते जास्त काळ साठवून ठेवायचे असेल तर ते अधूनमधून थोडे ऊन द्यावे त्यामुळे तसेच ते लोणचे कोरड्या जागी आपण स्टोर करून ठेवावे आणि जेव्हा तुम्हाला लोणचे खावेसे वाटेल तेव्हा स्वच्छ कोरड्या चमच्याने ते थोडे बाहेर काढून घ्यावे व नंतर आपण ते पॅक करून परत ठेऊन द्या ह्यामुळे लोणचे खूप दिवस राहते चांगले टिकते.

६. केळीच्या घडाला आपण जर लटकवून ठेवले तर आपली ती केळी ५ ते ६ दिवस खराब होत नाही.

७. जर आपल्या फ्रीझ चा खूप वास येत असेल तर कोळश्याने भरलेली वाटी आपण फ्रीझ मध्ये ठेवून द्या आपल्या फ्रीझ मधील सर्व दुर्गंधी दूर होईल.

८. जर तुम्ही हिरव्या मिरच्यांचे देठ तोडून फ्रीजमध्ये त्या मिरच्या ठेवल्या तर त्या हिरव्या मिरच्या जास्त काळ ताजा राहतात.

९. कांदे तळताना त्यामध्ये आपण थोडीशी साखर घालावी अगदी चिमूटभर त्यामुळे कांदे लवकर भाजतात व ते कुरकुरीत देखील होतात.

१०. कैरीचे लोणचे बनवताना त्यात आपण अगदी थोडासा गूळ घालून ते चांगले मिक्स करा, त्यामुळे आपले लोणचे अधिक स्वादिष्ट लागते.

तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या काही किचन टिप्स तुम्हाला कश्या वाटल्या नक्की कॉमेंट करून कळवा तसेच अश्याच अनेक लेखांसाठी आमच्या पेज ला फॉलो करा तसेच तुम्हाला आणखी काही अश्याच उपयुत्क किचन टिप्स माहिती असतील तर आम्हाला त्या कॉमेंट करून नक्की सांगा, धन्यवाद.