हिंदू धर्मात गुढीपाडवा हा नववर्षातला पहिला दिवस मानला जातो. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो. प्रत्येक जण हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. तसेच आपण या गुढीपाडवा या सणाची संपूर्ण माहिती आणि शुभ मुहूर्त आपण जाणून घेऊयात.
भारतात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा होतो.गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. गुढीपाडवा या दिवशी बरेच जण नवीन वस्तु खरेदी करतात किंवा सोनं खरेदी करतात. तसेच काही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तरी काही जण या शुभ मुहूर्ता वर करतात. गुढीपाडव्या दिवशी सगळेजण एकमेकांना शुभेच्छा देतात.
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त हा ८ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११.५० मिनिटांनी चालू होत आहे. तसेच ९ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८.३० मिनिटांनी समाप्त होत आहे.
गुढीपाडवा हा सण कसा साजरा करतात हे आपण जाणून घेऊयात. प्रत्येकजण आपल्या दारात गुढी हि उभारतात. तसेच गुढी हि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते.
आपण गुढी ज्या ठिकाणी उभारणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी आणि गुढी हि नेहमी पाटावर उभारावी. तसेच गुढीसमोर छान अशी रांगोळी काढावी.एक उंच असा खांब घेतला जातो त्याला रेशमी वस्त्र किंवा साडी ,आंब्याची ढाळी ,कडुलिंबाची ढाळी ,सुगंधी फुलांचा हार ,साखरेची गाठी आणि तांब्याचा गडू लावून गुढी उभारली जाते. गुढी हि नेहमी दरवाज्याच्या उजव्या बाजूला उभारावी. त्यानंतर नैवेद्य दाखून आरती करावी.
गुढीपाडव्याच्या दिवशी बरेचजण कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करतात. यामागे सुद्धा पाहू कारण आहे जस कि उन्हाळा खूप वाढलेला असतो त्यामुळे आपले शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने हि अंघोळीच्या पाण्यात टाकतात. तसेच कडुलिंबाची फुलाचा अर्क हा प्रसाद म्हणून दिला जातो . यामुळे आपल्याला काही रोगराई होत नाही.
मित्रांनो आपण गुढी हि का उभारतो,हे आपण जाणून घेऊयात. प्रभू राम ,सीता आणि लक्ष्मण हे १४ वर्ष वनवास करायला गेले होते.तेव्हा त्यांनी लंकाधिपती रावणाचा आणि तसेच अनेक दृष्ट राक्षसाचा वाढ केला आणि ते आपला वनवास संपवून जेव्हा अयोध्येला आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सगळ्यांनी आपल्या दारासमोर विजयाची गुढी उभा केली होती. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा चालू झाली.