कधी आहे मकरसंक्रांत संपूर्ण माहिती जाणून घ्या ,विधी , मुहूर्त आणि वाहन कोणतं..
धार्मिक

कधी आहे मकरसंक्रांत ? संपूर्ण माहिती जाणून घ्या ,विधी , मुहूर्त आणि वाहन कोणतं..

मित्रांनो हिंदू धर्मात सगळ्याचं सणाला खूप महत्व आहे. नवीन वर्षातील पहिला सण हा मकरसंक्रांत आहे. ग्रहांचा राजा सूर्य देव हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत जातो त्याला संक्रांत म्हणतात. परंतु ज्या वेळेस सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात त्याला मकर संक्रांत असे म्हटलं जात.

मित्रांनो यावर्षी मकरसंक्रांत नेमकं कधी आहे,मुहूर्त,वाहन कोणतं ,पूजा विधी या बद्दल संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात .

भोगीचा उत्सव असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी:-

संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी साजरी केली जाते.हिवाळ्यात भाज्या ह्या खूप ताज्या ताज्या असतात. हिंदू धर्मात भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्या मिक्स करून त्याची भाजी केली जाते आणि तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते.

मकरसंक्रांतीचा मुहूर्त :-

मित्रानो मागच्या दोन वर्षाप्रमाणे मकरसंक्रांती हि १५ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार मकरसंक्रांतीचा मुहूर्त हा सकाळी ७ वाजून १७ मिनिट ते सायंकाळी ६ वाजून २० मिनिटापर्यंत पुण्यकाळ मुहूर्त सुरु होणार आहे.या वेळी सूर्यदेव हे धनु राशीतून मकरराशीत प्रवेश करणार आहे.

संक्रांतीला आपण सगळ्यांना तिळगुळ देतो आणि त्यांना आपण “तिळगुळ घ्या ,गोड गोड बोला “असं सगळयांना बोलतो.तसेच संक्रांतीला दिवस आणि रात्र हि सामानच असतेआणि या दिवशीनंतरचे दिवस हे मोठे आणि रात्र हि लहान होते. संक्रांतिपासून हिवाळा हा संपण्यास सुरुवात होते आणि वातावरण हे गरम होण्यास सुरुवात होते.