अर्थ लाईफस्टाईल

२०२४ या नवीन वर्षामध्ये UPI payment चे बदलेले नवीन नियम जाणून घ्या …

मित्रांनो भारतात असंख्य लोक हे UPI paymentचा वापर करताना दिसतात. आता UPI payment हे वापरणं खूप सोपं वाट आहे. याचा उपयोग आपण भाजी,किराणा दुकानात ,दळण ,पार्लर आणि अगदी छोटया छोट्या कामासाठी सुद्धा आपण UPI payment चा वापर कर असतो.सगळ्यांनाच आता UPI payment चा वापर अगदी सोप्पा झाला आहे.

मित्रांनो २०२३ मध्ये आपल्याला UPI payment वापरण्याची खूप सवय झालेली आहे.त्यामुळे आपल्या जवळ cash हि नसतेच.परतु UPI payment आपण वापरतो पण त्याच्यात frod होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. कारण आपण सगळेच UPI payment चा वापर करतो आणि UPI payment चा वापर अधिक होणार म्हणजेच व्यवहार जास्त होणार तर फ्रॉड तर जास्त होणारच ना.

मित्रांनो UPI payment चा व्यवहार करताना security असावी ,त्यामुळे UPI payment च्या व्यवहारामध्ये फ्रॉक होऊ नये म्हणून १ जानेवारी २०२४ या नवीन वर्षी UPI paymentमध्ये नवीन नियम काढण्यात आलेले आहेत.UPI payment करताना आपण बिनधास्त व्यवहार करावेत त्यामुळे आर बी आय हे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. ते नियम पुढीलप्रमाणे जाणून घेउयात.

१ जानेवारीपासून UPI Payment चे नवीन नियम :-

१) UPI आयडी वरून वर्षभरात एकही पायमेन्ट करण्यात आलेले नसेल तर तर अश्या UPI आयडी हा ब्लॉक करण्यात येणार आहे.जर तुमचा UPI आयडी हा जर बंद असेल तर तो तुम्हाला ऍक्टिव्ह करावा लागणार आहे.

२) UPI आयडी वरून ३१ डिसेंबर पर्यंत एका पेक्षा पेमेन्ट केलेले असले पाहिजे.जर तुम्ही UPI पेमेंट केलेले नसेल तर १ जानेवारी २०२४ ला तुमचा UPI आयडी ब्लॉक होईल.यामुळे याचे नुकसान हे Google pay ,Paytm ,Phonepay याना होणार आहे.

३)UPI पेमेंट मध्ये आता पेमेन्टचे लिमिट कामी करण्यात आले आहे. तुम्ही आता फक्त १ लाखा पर्यंतच याचा वापर करू शकणार आहेत.

४)UPI आयडी वरून तुम्ही स्पेशल पेमेंट हे ५ लाखा पर्यंत करू शकणार आहेत. स्पेशल पेमेंट म्हणजेच शाळेंची फी ,दवाखाना,कॉलेजची फी अश्या प्रकारचे पेमेंट हे तुम्ही ५ लाखापर्यंत हे पेमेंट एका दिवसात करू शकता.

५)१ जानेवारीपासून नवीन किंवा अनोळखी व्यक्ती सोबत होणारे २ हजारपेक्षा जास्त पेमेंट हे होण्यासाठी ४ तास लागू शकतात.

६) UPI वरून जर तुम्ही जर नवीन व्यक्तीला पेमेन्ट केलेले असेल तर ते तुम्ही ला ४ तासाच्या आत तो व्यवहार कॅन्सल करता येणार आहेत.

७)UPI पेमेंट करताना आपल्याला त्या माणसाचे खरे नाव आपल्याला दिसणार आहे.

८)UPI पेमेंट करताना आपल्या अकाउंट जर पैसे नसतील तर आपल्याला UPI क्रेडिट चा वापर करता येणार आहे.मित्रांनो आता आपण UPI चा क्रेडिट कार्ड सारखा वापर करता येऊ शकणार आहे.

९)UPI क्रेडिट कार्ड साठी १,१ टक्के चार्जे त्या पेमेंट कर द्यावा लागणार आहे.

१०)UPI ATM कार्ड आता आपल्याला काही दिवसातच मिळणार आहे आपण आल्या UPI च्या क्युअर कोड नि ATM मधले पैसे काढता येणार आहेत.