Kofta curry recipe
लाईफस्टाईल

काकडी कोफ्ता कसा तयार करायचा या बदल माहिती जाणून घ्या.

जर आपण आपल्या घरी आपले पाहुणे जेवायला येणार असतील. आणि त्यांच्या साठी काही विशेष भाजी तयार करायची असेल तर त्यसाठी काकडी कोफ्ता हा हा एका खुप चलगला पर्याय होऊ शकतो. यामुळे जास्त सेवन केले तरी पोटाला कोणतीही हानी होणार नाही. आणि पाहुण्यासाठी एक नवीन चवीचा पदार्थ होऊ शकतो. त्याच बरोबर आपण काहीतरी नवीन केल्याचे सुद्धा समाधान होईल. कॉर्न आणि मलाय कोफ्ते अनेकदा पाहुण्यांना देण्यात आले असतील, पण जर तुम्ही यापूर्वी काकडी कोफ्ता बनविला नसेल तर या वेळी नक्कीच करुन पहा.

लागणारे आवश्यक घटक

काकडी कोफ्तासाठी लागणारे घटक असे आहेत २ काकडी, २ उकडलेले मॅश बटाटे, कॉर्नफॉलवर पीठ २ छोटा चमच्या , हिरव्या मिरची पेस्ट – छोटा चमच्या, तिखट आवडीनुसार, मीठ चवी नुसार, तेल तळण्यासाठी.

करीसाठी आवश्यक घटक :

बारीक चिरलेला कांदा दोन ते तीन चमचे, टोमॅटो बारीक चिरलेला, चिरलेली बारीक कोथींबीर दोन चमचे, बारीक चिरलेले आले-१ चमच्या , दोन हिरव्या मिरच्या चिरलेल्या, हिंग, गरम मसाला गरजेनुसार, आमचूर पावडर अर्धा चमचा, लाला मिरची पावडर गरजेनुसार, जिरे , हळद, धने पवडर, आणि मीठ गरजेनुसार. आणि तेल.

कृती
काकडीचे कोफ्ते करण्यासाठी काडी आधी सोलून घ्या त्या नंतर ती बारीक किसून घ्या त्यानतंर त्यातील पाणी कडून घ्या. मॅश केलेले बटाटे आणि कॉर्नफ्लोर एकत्र मिक्स करून घ्या. त्याच बरोबर इतर सर्व साहित्य पिठासारखे मळून घ्या. त्यात तेल टाकू नका. आता जे मिश्रण तयार झाले आहे, त्याचे हव्या तश्या आकारचे कफते तयार करा . छोटे केले तरी चालतील. त्यानतंर तेल गरम करा आणि त्यात ते तळून घ्या, कलर थोडा सोनेरी होईपर्यंत तळा.

टोमॅटो, कांदा, आले आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मध्ये बारीक करा. कढईत तेल गरम करायला ठेवा, त्यात जिरे आणि हिंग आणि थोडे परतून घ्या. कांदा-टोमॅटो पेस्ट त्यात टाकून ती सुद्धा परतून घ्या. इतर सर्व मसाले टाका फक्त घाला गरम मसाले सोडून. आपण हे काही मिश्रण तयार केले आहे. त्या मिश्रणाला थोडे तेल सुटू लागल्यावर त्यात एक ग्लास पाणी चालून शिजवा, आता आपली करी तयार झाली आहे. त्यात कोफ्ता सोडा आणि गरम मसाला टाकून त्याला थोड्यावेळ शिजायला वेळ द्या दहा ते पंधरा मिनिटानंतर कोथंबीर त्यावर टाकून ती सर्व्ह करा.