लाईफस्टाईल

पहाटे पहाटे कोंबडा का बाग देतो ? आणि कोंबडी का बर बाग देत नाही.

मित्रांनो आजच्या लेखाचा विषय अगदी खूप मजेशीर आहे. तुम्ही जर खेडेगावात राहत असाल किंवा जर तुम्ही निमशहरी गावात जर राहताय तर तुम्हाला कोंबड्याच्या आवाजाने सकाळी सकाळी जाग आलीच असेल कि? पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे काय कि कोंबडा हा पहाटेचा हा आवाज का करतो म्हणजे अरवतो का असा दमदार आवाज का काढतो ? ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्या माहितीप्रमाणे खूप कमी लोकांनाच माहिती असावे. पण आज तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर माहिती करून घेणार आहात. तसेच आजच्या लेखात आपण हे देखील जाणून घेणार आहोत कि फक्त कोंबडाच का अरवतो कोंबडी का पहाटे आरवत नाही.

खर तर कोंबडे हे पहाटेची वेळ अगदी बरोबर ओळखतात परंतु हे सर्व त्यांच्या शरीराच्या रचनेवर व आतील गुणांवर अवलंबून असते. ह्या कारणांमुळे कोंबड्यांना सर्केडियन घड्याळ असे देखील संभोधतात म्हणेजच जिवंत घड्याळ असे देखील म्हणतात. परंतु प्रश्न इथेच थांबत नाही, तर मुद्दा असा आहे कि कोंबडा हा सकाळच्या वेळीच का अरवतो, दुपारच्या ववेळी किंवा रात्रीला का नाही.

ह्या प्रश्नाचे उत्तर व ह्यामागे एक विज्ञान आहे, वैज्ञानिकांच्या मते कोंबड्यामध्ये पहाटेच्या वेळी त्यांची सगळ्यात जास्त हार्मोनल ऍक्टिव्हिटी होते. म्हणूनच कोंबडा फक्त सकाळीच ओरडतो. एका जपानच्या कोंबड्याबद्दलच्या संशोधनात शास्त्रज्ञांना असे दिसून आले कि पहाटेच्या आधीच म्हणजेच सूर्य उगवण्या आधी कोंबडा हा सूर्याची किरणे येण्याआधीच पहाटेच सूर्य उगवण्याची अगदी योग्य चाहूल घेतो व तो सूर्य उगवण्याची चाहूल देतो व तो अरवतो.

शास्त्रज्ञांचा मते कोंबड्याचे असे आरवणे हे त्यांच्या अंतर्गत घड्याळ आणि सर्केडियन लयनुसार कंट्रोल केले जाते, हि एक जैविक प्रक्रिया आहे. हि प्रक्रिया वनस्पतींसोबत तसेच ती प्राण्यांमधये देखील होते. शास्त्रज्ञानि दोन वेगळे वेगळे ग्रुप केले. पहिल्या ग्रुप मधील कोंबडे १२ तास हे अंधुक प्रकाशात ठेवण्यात आले आणि त्यांचे वर्तन पाहणी केली ह्या प्रयोगात त्यांना असे आढळले की कोंबडा मंद प्रकाशातून तीव्र होताच ते अरवतो आहे. ह्यावरून असे स्पष्ट झाले कि कोंबडा हा पहाटे सूर्याचा प्रकाश समजून तो अरवतो ते.

तर मित्रांनो आजची माहिती तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल, अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेज ला लाइक करा आजच्या लेखाला जास्तीत जास्त शेयर देखील करा, धन्यवाद.