वास्तुशास्त्रा

लक्ष्मी सदैव वास करेल जर, तुमच्या घरात ह्या ५ पैकी एक जरी झाड असेल तर.

मित्रानो प्रत्येकालाच आपलं घर छान दिसावं असं वाटतं,त्यामुळे आपण आपल्या घराच्या अंगणात आणि घरात झाडे लावतात, त्यामुळे घराची शोभा हि वाढते. तसेच घर हे वेगवेगळ्या झाडांमुळे खूप छान आणि दिसायला लागते.आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या वेगवेगळ्या झाडांमुळे आपले मन हि प्रसन्न होते.

मित्रानो आजकालच्या ह्या फ्लॅट सिस्टिममुळे झाडे हि आपल्याला कुंड्यांमध्ये लावावी लागतात. आज काल इनडोअर प्लांटमुळे आपण वेगवेगळी झाडे हि घरात लावू शकतो. तसेच काही झाडांमुळे आपले घर हे सुंदर तर दिसतेच तसेच त्या झाडांमुळे आपले भाग्य हि बदलते. तसेच त्यां झाडांमुळे आपल्या घरात पॉसिटीव्ह एनर्जी मिळते आणि लक्ष्मी हि आपल्यावर प्रसन्न होते.

मित्रानो असं म्हणतात कि, झाडांमध्ये देवदेवता असतात आणि झाडे हि आपल्याला यश मिळून देतात. आपल्याला पॉसिटीव्ह बनवतात. आपल्या घरात हि झाडे असावीत तर मित्रानो ती झाडे कोणती आहेत ते आपण खालीलप्रमाणे बघुयात.

१)तुळस-:तुळस हि खूप पवित्र मानली जाते. आपल्या घरात तुळशीचं झाड हे असलच पाहजे . तसेच तुळशीची पूजा हि दररोज केली पाहिजे, तुळस हि पूर्व किंवा उत्तर दिशेला असलयास अधिक चांगलं असत. तसेच संद्याकाळी तुळशीजवळ दिवा आणि उदबत्ती हि लावली पाहिजे. तुळस हि विष्णुप्रिय म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तुळशी आणि भगवान विष्णू हि आपल्यावर प्रसन्न होते आणि लक्ष्मी माता हि आपल्यावर प्रसन्न होते.

२)मणी प्लॅन्ट :-मनी प्लॅन्ट हे आपल्या घरात असणे खूप शुभ मानले जाते. प्रत्येकानी मणी प्लॅन्ट हे आपल्या घरात लावले पाहिजे. पण मनी प्लॅन्ट हे आपल्या मैत्री कडून तसेच शेजाऱ्यांकडून आणावे, पण हे झाड विकत आणू नये. मनीप्लँट हे झाड नेहमी हिरवे गर असावे , हे झाड जसे बहरलं असं आपली प्रगती होत असते. हे झाड कधी वळून देऊ नये त्याची काळजी हि योग्यरीत्या घ्यावी .

३)बांबूचं झाड ;-बांबूचं झाड हे घरात असल्यामुळे वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. बांबू च झाड हे खूप पॉसिटीव्ह असते. बांबूचं झाड हे घरात लावल्याने घराची प्रगती होते. बांबूचं झाड हे खूप शुभ असते. बांबूचं झाड हे आपल्या घरात लावल्याने आपलय घरातल्या सदस्याचे आरोग्य सुधारते. बांबूचे झाड घरात असल्याने लक्ष्मी हि आपल्या घरात वास करते . त्यामुळे तुमच्या घरात बांबू चे झाड हे लावल्यास तुम्हाला खूप फायदा होईल. तसेच बांबूचे झाड हे पूर्व दिशेला असावे.

४)गोकर्णाचे झाड :-गोकर्णाचे झाड घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो. गोकर्णाच्या झाडामुळे आपल्या घरात पॉसिटीव्हिटी वाढते. गोकर्णाच्या वेलीला विषुप्रिय असे म्हणतात. निळ्या गोकर्णाचे फील हे शनिदेवांना प्रिय असते. गोकर्णाचे झाड हे ईशान्य दिशेला लावलेली असावी. गोकर्णाच्या झाडामुळे आपल्या घराची प्रगती होते. तसेच आपल्याला पैश्याची कमतरता भासत नाही.

५)स्नेक प्लांट :-स्नेक प्लॅन्ट हा वास्तूसाठी खूप शुभ आहे. स्नेक प्लॅन्ट घरात लावल्याने आपले आजारपण दूर होण्यास मदत होते. स्नेक प्लॅन्ट घरात लावल्याने आपला ट्रेस कमी होण्यास मदत होते. स्नेक प्लॅन्ट हे खूप सुंदर दिसतं . स्नेक प्लॅन्ट हि हवा शुद्ध करण्याचं काम करते.तसेच रात्री आपल्या घरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवते. स्नेक प्लॅन्ट हे आपल्या घरात धन लाभ होते , तसेच लक्ष्मी सदैव आपल्या घरात वास करते.

मित्रानो तुम्ही हे ५ झाड तुमच्या घरात लावा आणि तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा. तसेच तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कंमेन्ट करून तसेच लाईक करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेयर करा. धन्यवाद .